शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
2
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
3
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
4
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
5
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
6
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
7
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
8
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
9
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
10
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
11
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
12
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
13
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
14
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
15
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
16
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
17
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
18
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
19
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
20
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं

वाजत-गाजत बाप्पाचे आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 11:53 PM

मागील अनेक दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा केली जात होती, त्या गणपती बाप्पाचे आगमन गुरूवारी झाले. सार्वजनिक गणेश मंडळे तसेच सामान्य नागरिकांनीही वाजत गाजत बाप्पाला घरी आणले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर घरी बाप्पा आल्याचा आनंद ओसंडून वाहात होता.

ठळक मुद्दे१० दिवस राहणार जल्लोष : सार्वजनिक मंडळांसह घरगुती गणेश मूर्तींची प्रतिष्ठापना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मागील अनेक दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा केली जात होती, त्या गणपती बाप्पाचे आगमन गुरूवारी झाले. सार्वजनिक गणेश मंडळे तसेच सामान्य नागरिकांनीही वाजत गाजत बाप्पाला घरी आणले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर घरी बाप्पा आल्याचा आनंद ओसंडून वाहात होता.श्रावण मासाला सुरूवात झाल्यापासून गणेश भक्तांना गणरायाच्या आगमनाचे वेध लागले होते. गुरूवारी घरची कामे तत्काळ आटोपून गणेशभक्त गणरायाची मूर्ती खरेदी करण्यासाठी कुंभार मोहल्ल्यात पोहोचले. आपल्या आर्थिक क्षमतेनुसार गणेशभक्त गणरायाच्या मूर्तीची निवड करताना दिसून येत होता. नगर परिषद व अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी प्लास्टर आॅफ पॅरीसच्या मूर्ती तयार करू नये, असे आवाहन केल्यानंतर स्थानिक कारागिरांनी प्लास्टर आॅफ पॅरीसचा वापर केला नाही. मात्र ऐन वेळेवर गुरूवारी विक्रीसाठी गडचिरोली शहरात आलेल्या काही मूर्ती मात्र प्लास्टर आॅफ पॅरीसच्या असल्याचे दिसून आले. मात्र माती व प्लास्टर आॅफ पॅरीस यातील फरक न कळल्याने काही गणेशभक्त चांगली व स्वस्त दिसेल, अशा मूर्तीला प्राधान्य देत मूर्ती खरेदी करीत होते.मागील वर्षी दुष्काळी परिस्थिती होती. त्यामुळे शेतकरी चिंतातूर होता. यावर्षी मात्र पावसाने शेतकऱ्याला साथ दिली आहे. शेतातील हिरवेगार पीक डोलतांना बघून शेतकरी आनंदी आहे. त्याचा हा आनंद गणेशाच्या आगमनामुळे आणखी द्विगुणीत होणार आहे.गडचिरोली शहरात खासगी तसेच सार्वजनिक मंडळांच्या वतीने गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. त्यामुळे कुंभार मोहल्ल्यात गर्दी उसळते. या परिसरात पोलीस व गृहरक्षक दलाच्या जवानांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दिवसभरात कोणतीही अनुचित घटना घडली नाही.गणरायाच्या नैवेद्यासाठी स्वतंत्र भाज्यांची विक्रीगणपतीबाप्पाला २१ प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य पहिल्या दिवशी दाखविला जातो. २१ भाज्या गोळा करणे प्रत्येक व्यक्तीला शक्य होत नाही. त्यामुळे २१ भाज्यांचे मिश्रण करून ते विक्रीस ठेवण्यात आले होते. या माध्यमातून स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला. आजपर्यंत दुर्लक्षित झालेल्या पत्रावळींनाही सुगीचे दिवस आले. घटस्थापना करण्यासाठी तसेच नैवेद्य दाखविण्यासाठी पत्रावळीचा वापर केला जात असल्याने पत्रावळीची मागणी वाढली होती. गणरायाचा आवडता पदार्थ असलेले मादक हॉटेलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. कामाचा व्याप अधिक असलेल्या महिला हॉटेलमधील मोदक खरेदी करण्यास पसंती दर्शवित होत्या.शांतता कमिटीच्या बैठकांना खोगणेशोत्सव शांततेत पार पडावा, यासाठी गणेशोत्सवापूर्वी शांतता कमिटीची पोलीस स्टेशन स्तरावर बैठक आयोजित केली जाते. या बैठकीला प्रामुख्याने गणेश मंडळांचे पदाधिकारी उपस्थित राहतात. त्यांना शासनाचे नियम समजावून सांगितल्या जातात. सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन सुध्दा केले जाते. त्यामुळे शांतता कमिटीच्या सभेचे विशेष महत्त्व आहे. मात्र यावर्षी बहुतांश पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठकच झाली नाही.मोठ्या आवाजाचे अनेक दुष्परिणाम आहेत. त्यामुळ डीजे, संदल, बॅन्ड यांच्या आवाजावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. मागील वर्षी नियम तोडणाºया गडचिरोलीतील काही मंडळांवर कारवाई करण्यात आली होती. याही वर्षी याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८