तणनाशकांच्या वापराने जमिनीचा पाेत बिघडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:34 AM2021-08-01T04:34:27+5:302021-08-01T04:34:27+5:30

काही वर्षांपूर्वी शेतकरी शेती व्यवसायासोबतच गाय, बैल, म्हैस, शेळ्या, मेंढ्या आदी जनावरे पाळत होते. जनावरांची विष्ठा शेणखत म्हणून शेतीसाठी ...

The use of herbicides has damaged the soil | तणनाशकांच्या वापराने जमिनीचा पाेत बिघडला

तणनाशकांच्या वापराने जमिनीचा पाेत बिघडला

googlenewsNext

काही वर्षांपूर्वी शेतकरी शेती व्यवसायासोबतच गाय, बैल, म्हैस, शेळ्या, मेंढ्या आदी जनावरे पाळत होते. जनावरांची विष्ठा शेणखत म्हणून शेतीसाठी उपयोगी पडत होती. शेणखतातून शेतीला मोठ्या प्रमाणावर पोषक तत्त्वे मिळत होती. या तत्त्वांमुळे शेतीला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचत नव्हती. शिवाय शेतीचा पोत वाढत होता. सोबतच पूर्णपणे निरोगी पिकांपासून शेतकऱ्यांना भाजीपाला व इतरही पिके घेता येत होती. उत्पन्नाचा दर्जा चांगला राहत होता. त्यामुळे पौष्टिक अन्न मिळण्यास मदत व्हायची; परंतु आता परिस्थिती बदलली आहे. पूर्वी खरीप आणि रब्बी पिकांवर कोणत्याही रोगाचे आक्रमण झाले तरी शेतकरी स्वतः उपाययोजना करीत होता; परंतु कालांतराने ही पद्धत मोडीत निघाली. आता कोणत्याही गावात हे चित्र दिसत नाही. पीक चांगले राहण्याकरिता रासायनिक खतांचा भरमसाट वापर केला जात आहे. परिणामी जमिनीतील आवश्यक पोषण तत्त्वे नष्ट होत आहेत. जिल्ह्यात धान, सोयाबीन व कापसाचे उत्पादन घेतले जाते. या पिकांच्या वाढीसाठी रासायनिक खतांचा वापर केला जातो.

Web Title: The use of herbicides has damaged the soil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.