शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीमध्ये फटाक्यांचा वापर पर्यावरणपूरक पद्धतीने करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2020 20:38 IST

Diwali Gadchiroli News दिवाळी किंवा इतर सणासुदीच्या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी फटाक्यांचा वापर पर्यावरणपूरक पद्धतीने करावा व ध्वनी व वायू प्रदूषणावर आळा घालावा असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केल आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : फटाक्यांच्या वापरामुळे वायू प्रदुषण होऊन त्यातून विषारी वायूचे उर्त्सजन होते. त्यामुळे सदर बाबीस आळा घालण्याकरीता सुणासुदीच्या दरम्यान करावयाच्या उपाययोजनबाबत न्यायालयाने मार्गदर्शक सुचना निर्गमित केल्या आहेत. याबाबत जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दिवाळी किंवा इतर सणासुदीच्या कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी फटाक्यांचा वापर पर्यावरणपूरक पद्धतीने करावा व ध्वनी व वायू प्रदूषणावर आळा घालावा असे आवाहन जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी केली आहे. कमी धूर उर्त्सजन करणारे फटाके व पर्यावरण पूरक फटाक्यांची निर्मिती व विक्री अनुज्ञेय राहणार आहे. फटाक्यांची माळ किंवा एकत्रीत फटाके यांच्या निर्मिती, विक्री व वापरास भरपूर प्रमाणात वायू, ध्वनी घनकचऱ्याचा प्रश्न निर्माण होत असल्याने त्यावर बंदी घालण्यात आली आहे.

फटाक्याची विक्री ही केवळ परवाना धारकास अनुज्ञेय राहिल व त्यांना केवळ परवाना प्राप्तच फटाक्यांची विक्री करता येणार आहे. ऑनलाईन संकेतस्थळावरुन फटाक्यांची विक्री करता येणार नाही. असे आढळून आल्यास तो सर्वोच्च न्यायालयाचा अवमान समजण्यात येणार आहे व तो द्रव्यदंडाच्या शिक्षेस पात्र राहील. फटाक्यामध्ये बेरीयम साल्टचा वापर अनुज्ञेय राहणार नाही. ज्या फटाक्याची निर्मिती यापूर्वी करण्यात आलेली आहे व जी सदर शर्ती पुर्ण करु शकत नाही त्यांना परवानगी असणार नाही. स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस अधिकारी यांनी दिवाळी व इतर धार्मिक कार्यक्रम, विवाह कार्यक्रम इत्यादी मध्ये होत असलेल्या फटाक्यांचा वापर खरेदी, विक्री व ताब्याबाबत तपासणी करावी व उपरोक्त नमुद निदेर्शांचे उल्लंघन होत असल्यास फटाका परवाना रद्द करण्याबाबत त्वरीत निदर्शनास आणून द्यावे असे सूचित करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शंक सूचना संपूर्ण जिल्ह्यास पोलीस प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था व सर्व तहसिलदार यांनी त्यांचे स्तरावर काटेकोरपणे पालन करावे, असे जिल्हादंडाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

टॅग्स :DiwaliदिवाळीCrackersफटाके