शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी आवळल्या बेशिस्त वाहनचालकांच्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 05:00 IST

गडचिरोली ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावकर व वाहतूक शहर शाखा प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम गोरे यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली शहरात व नगर पालिकेच्या हद्दीत वाहतूक सुरळीत करण्यासोबतच वाहतुकीला शिस्त लावण्याच्या कामासाठी २० पोलीस शिपाई कार्यरत आहेत. यामध्ये एक महिला अधिकारी व २० शिपाई मिळून २१ जणांची टीम आहे.

ठळक मुद्देमहिनाभरात २ हजार ३४७ वाहनांवर कारवाई; गडचिरोली शहर वाहतूक शाखेने वसूल केला ५ लाख २६ हजारांचा दंड

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कोरोनाच्या संचारबंदीत बहुतांश नागरिक बाहेर कुठेही न फिरता घरीच राहून जीवन व्यतीत करीत आहेत. मात्र वाढत्या तापमानात काटेकोरपणे कर्तव्याचे पालन करीत गडचिरोली पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या वाहतूक पोलिसांनी बेशिस्त व विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करून त्यांच्या मुसक्या आवळल्या. २० मार्च ते २१ एप्रिल २०२० महिनाभरात तब्बल २ हजार ३४७ वाहनांवर कारवाई करून तब्बल ५ लाख २६ हजार रुपयांचा दंड वसूल केला.गडचिरोली ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावकर व वाहतूक शहर शाखा प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम गोरे यांच्या मार्गदर्शनात गडचिरोली शहरात व नगर पालिकेच्या हद्दीत वाहतूक सुरळीत करण्यासोबतच वाहतुकीला शिस्त लावण्याच्या कामासाठी २० पोलीस शिपाई कार्यरत आहेत. यामध्ये एक महिला अधिकारी व २० शिपाई मिळून २१ जणांची टीम आहे. यामध्ये १० महिलांचा समावेश आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी २२ मार्चपासून राज्यात व देशभरात लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर संचारबंदीची मुदत वाढवून ३ मे पर्यंत करण्यात आली. संचारबंदीच्या काळात शहरातील वाहतूक पोलीस चामोर्शी, आरमोरी, धानोरा, मूल या चार मुख्य मार्गावर अनेक ठिकाणी तसेच इंदिरा गांधी चौकात तैनात राहून बेशिस्त व विनापरवाना दुचाकी व चारचाकी वाहनचालकांवर कारवाई करीत आहेत.ई-चलान मशीनने प्रक्रिया झाली सुलभवाहतूक शहर शाखेत कार्यरत असलेल्या वाहतूक पोलिसांकडे ई-चलान मशीन उपलब्ध असून जून २०१९ पासून मोक्यावर जेव्हाच्या तेव्हा चलानची कारवाई केली जात आहे. यापूर्वी न्यायालयात चलान भरून वाहन सोडवावे लागत होते. मात्र आता स्पाट ई-चलानमुळे वाहतूक पोलीस व वाहनधारकांसाठी ही प्रक्रिया सुलभ झाली आहे. दोघांचाही वेळ वाचत आहे. ई-चालान मशीनमध्ये वाहनाचा फोटो, चालक फोटो, वाहन क्रमांक, परवाना, चालक व मालकाचा मोबाईल क्रमांक आदी नमूद करून कोणत्या कलमान्वये कारवाई केली जात आहे. या कलमाचाही उल्लेख केला जात आहे. या मशीनमधून दंडाची पावती मिळत आहे. परवाना जवळ नसलेल्या वाहनधारकांकडून २०० रुपये, परवाना मुळीच काढला नसेल तर ५०० रुपये दंड आकारला जात आहे. याशिवाय विमा, पियूसी, आरसी बुक आदी दस्ताऐवजाची पडताळणी वाहतूक पोलीस करीत आहेत.वाहनचालकांचा सुरू आहे ब्रेन वॉशकोरोनाच्या संचारबंदीत वाहनचालकांनी विनाकारण फिरू नये. संचारबंदीचे उल्लंघन करू नये, अशा सूचना देऊन वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांचा ब्रेन वॉश केला जात आहे. वाहन चालविताना मास्क लावा, परवाना सोबत ठेवा, शारीरिक अंतर ठेवा, असे वाहनचालकाला सांगून जनजागृती घडवून आणण्याचे काम वाहतूक पोलीस करीत आहेत.

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीस