शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीतील विद्यार्थ्यांसाठी उघडले मुक्त शिक्षणाचे अनोखे दार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2018 02:08 IST

अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी पोलीस विभागाने पुढाकार घेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्रे सुरू केली आहेत.

गडचिरोली : अतिदुर्गम व नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शिक्षण घेता यावे यासाठी पोलीस विभागाने पुढाकार घेत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्रे सुरू केली आहेत. त्यात सुमारे ६२३ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देऊन त्यांचा शिक्षण घेण्याचा मार्ग प्रशस्त केला आहे.दुर्गम व नक्षलग्रस्त भागात जिल्हा परिषद शाळा व आश्रमशाळांमुळे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाची सोय उपलब्ध झाली असली तरी उच्च शिक्षणाची सोय मात्र उपलब्ध नाही. विशेषकरून एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, धानोरा या तालुक्यांमध्ये केवळ तालुकास्थळीच पदवी शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना तालुक्याचे ठिकाण गाठावे लागते. तालुक्यातील शेवटचे गाव सुमारे ७० ते ८० किमी अंतरावर असतात. वाहतुकीची साधने अत्यंत मर्यादित आहेत. ही अडचण लक्षात घेऊन पोलीस उपमहानिरिक्षक अंकुश शिंदे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी केंद्र स्थापन व्हावे यासाठी पाठपुरावा केला. दामरंचा, गॅरापत्ती, पेंढरी, हेडरी व ताडगाव येथे मुक्त विद्यापीठाचे अभ्यास केंद्र सुरू करण्यात आले आहे.२६२३ विद्यार्थ्यांनी घेतले प्रवेशउपक्रमाला चांगला प्रतिसाद देत सुमारे ६२३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. नवीन शैक्षणिक उपक्रमामुळे जिल्ह्यात पदवी प्राप्त विद्यार्थ्यांची संख्या वाढेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गडचिरोली पोलीस विभागाने सामाजिक कार्याचा नवा अध्याय सुरू केला आहे.

टॅग्स :Yashwantrao Chavhanयशवंतराव चव्हाणuniversityविद्यापीठEducationशिक्षणStudentविद्यार्थी