६० हजार विद्यार्थ्यांना यावर्षी मिळेल गणवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2018 11:02 PM2018-06-18T23:02:01+5:302018-06-18T23:02:36+5:30

सर्व शिक्षा अभियान अंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश दिला जाते. यावर्षी ६० हजार ५६१ विद्यार्थ्यांना गणवेशाचा लाभ दिला जाणार आहे. तीन कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.

Uninor will get 60 thousand students this year | ६० हजार विद्यार्थ्यांना यावर्षी मिळेल गणवेश

६० हजार विद्यार्थ्यांना यावर्षी मिळेल गणवेश

Next
ठळक मुद्देतीन कोटींचा निधी उपलब्ध : पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना लाभ

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सर्व शिक्षा अभियान अंतर्गत पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेश दिला जाते. यावर्षी ६० हजार ५६१ विद्यार्थ्यांना गणवेशाचा लाभ दिला जाणार आहे. तीन कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियान अंतर्गत दरवर्षी दोन गणवेश उपलब्ध करून दिले जातात. सदर गणवेशाचा लाभ अनुसूचित जाती, जमाती, बीपीएलमध्ये मोडणाऱ्या सर्व मुलामुलींना दिला जातो. तर इतर संवर्गातील केवळ मुलींनाच गणवेश उपलब्ध करून दिले जाते. दोन वर्षांपूर्वी गणवेशाची रक्कम शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यात जमा केली जात होती. मागील वर्षीपासून राज्य शासनाने थेट लाभ हस्तांतरण करून सुरू केली आहे. मागील वर्षी संबंधित विद्यार्थ्यांचे व त्याच्या आईचे संयुक्त खाते उघडावयास लावण्यात आले होते. पालकाने गणवेश खरेदी केल्याचे बिल मुख्याध्यापकांना सादर केल्यानंतर गणवेशाची रक्कम संबंधित विद्यार्थ्याच्या खात्यामध्ये जमा करण्यात येत होती. मागील वर्षी पहिल्यांदाच अशा प्रकारची प्रक्रिया राबविण्यात आली होती. अनेक विद्यार्थ्यांचे बँक खाते नसल्याने गणवेशाची रक्कम जमा होण्यास अडचण येत होती. सत्र संपूनही दुर्गम भागातील काही विद्यार्थ्यांनी बँक खाते उघडले नाही. त्यामुळे गणवेशाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली नाही. अनेक विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिले होते. सदर योजना पारदर्शी असली तरी ज्या विद्यार्थ्यांना बँक खाते उघडण्यास अडचण आली होती, असे विद्यार्थी गणवेशापासून वंचित राहिल्याने या योजनेवर पालक व शिक्षकांनी टिका सुध्दा केली होती. मागील वर्षीपर्यंत विद्यार्थ्याला प्रती गणवेश ४०० रूपये दिले जात होते. यावर्षी गणवेशाच्या रकमेत वाढ केली आहे. प्रती गणवेश ६०० रूपये दिले जाणार आहे. वाढलेली महागाई लक्षात घेऊन विद्यार्थ्याला चांगला गणवेश खरेदी करता यावा, या उद्देशाने गणवेशाच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे.
थोड्याफार विद्यार्थ्यांसाठी भेदभाव
सर्व शिक्षा अभियान अंतर्गत केवळ अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व बीपीएल लाभार्थ्यांच्या सर्व मुलामुलींना गणवेश दिले जातात. त्याचबरोबर सर्व मुलींनाही गणवेश दिले जाते. मात्र इतर मागासवर्गीय, खुला प्रवर्ग तसेच व्हीजे, एनटी, एसबीसी प्रवर्गातील पाल्यांच्या मुलांना याचा लाभ दिला जात नाही. जवळपास ८० टक्के मुलांना गणवेश दिले जाते. केवळ २० टक्के विद्यार्थी वंचित राहतात. त्यांना आपल्याबाबत भेदभाव होत असल्याची जाणीव निर्माण होते. त्यामुळे त्यांनाही गणवेश उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आहे.
पालकाच्या खात्यात जमा होणार रक्कम
मागील वर्षी गणवेशाची रक्कम केवळ विद्यार्थी व त्याच्या आईच्या संयुक्त खात्यात जमा होत होती. यासाठी स्वतंत्र नवीन खाते काढावे लागत होते. गडचिरोली जिल्ह्यात केवळ तालुकास्थळीच राष्ट्रीयकृत बँका आहेत. तालुकास्थळाचे गावापासून अंतर ५० ते ६० किमी आहे. बँकेत गेल्यानंतर एका दिवशी कधीच काम होत नव्हते. काही पालकांचे हजारो रूपये खर्च होऊन बँक खाते निघाले नाही. शेवटी पालकांनी बँक खाते उघडले नाही. त्यामुळे गणवेशाची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झाली नाही. या पध्दतीमुळे मागील वर्षी हजारो विद्यार्थी गणवेशाच्या रकमेपासून वंचित राहिले होते. मागील वर्षीचा कटू अनुभव लक्षात घेऊन यावर्षी सर्व शिक्षा अभियानने थोडी शिथीलता देत पालकाचे खाते असल्यास त्यांच्या खात्यावर रक्कम जमा केली जाणार आहे.

Web Title: Uninor will get 60 thousand students this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.