आॅनलाईन लोकमतगडचिरोली : पोलीस भरतीच्या जागा वाढवाव्या या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले.गडचिरोली जिल्ह्याचे आर. आर. पाटील पालकमंत्री असताना एक हजार पेक्षा अधिक पोलीस शिपाई पदाची भरती घेण्यात आली होती. त्यानंतर मात्र १०० ते १५० पदाचीच भरती घेण्यात येत आहे. यावर्षी केवळ ११९ जागा आहेत. पोलीस शिपाई पदाच्या जागा वाढविण्यात याव्या. एमपीएससीच्या मार्फत भरल्या जाणाºया जागांची संख्या वाढवावी, पीएसआय, एसटीआय, एएसओ यांची स्वतंत्र परीक्षा घ्यावी, संयुक्त परीक्षा रद्द करावी. क संवर्गातील जागा त्वरीत भराव्या, गडचिरोली जिल्ह्यात भूकंप व प्रकल्पग्रस्त नसल्याने या जागा रद्द कराव्या आदी मागण्यांसाठी जिल्हाभरातील शेकडो सुशिक्षीत बेरोजगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविले. आंदोलनाचे नेतृत्व युवक काँग्रेसचे लोकसभा अध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, नगरसेवक सतीश विधाते, एनएसयूआयचे जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, वसंत राऊत, कमलेश खोब्रागडे, पंकज बारसिंगे, मिलिंद खोब्रागडे, पंकज बारसिंगे, रजनिकांत मोटघरे, जगदेव कोल्हे, नंदू उडाण, प्रविण रायपुरे, दिशा आवळे, मंगेश मंगर, संकेत कुमोटी, श्रीकांत कुमोटी, राखी मेश्राम आदी उपस्थित होते. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
बेरोजगारांची जिल्हा कचेरीवर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 23:27 IST
पोलीस भरतीच्या जागा वाढवाव्या या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील सुशिक्षीत बेरोजगार युवकांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले.
बेरोजगारांची जिल्हा कचेरीवर धडक
ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना निवेदन : पोलीस शिपाईपदाच्या जागा वाढविण्याची मागणी