शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
3
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
4
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
5
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
6
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
7
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
8
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
9
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
10
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
11
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
12
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
13
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
14
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
15
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
16
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
17
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
18
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
19
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
20
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य केंद्रात नेमले अनधिकृत कर्मचारी, रुग्णांच्या जीवाशी सर्रास खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 16:10 IST

अतिदुर्गम कमलापूरमधील प्रकार : १८ वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी एकाच ठिकाणी

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : १८ वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी एकाच ठिकाणी ठाण मांडून. सोबतीला तीन कंत्राटी डॉक्टर अन् आरोग्य कर्मचारी. मात्र, कोणाचा कोणाला पायपोस नाही. डॉक्टर कधी येतात, तर कधी येत नाहीत. धक्कादायक म्हणजे येथे अनधिकृत कर्मचारी नेमण्यात आले असून रुग्णांच्या तपासणीपासून उपचारापर्यंतची सेवा तेच देतात. शिवाय काही रुग्णांना खासगी दवाखान्यातही पाठविले जाते. हा सगळा प्रकार अहेरी तालुक्याच्या कमलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू आहे.

कमलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ. राजेश मानकर हे वैद्यकीय अधीक्षक आहेत. ते १८ वर्षांपासून याच ठिकाणी ठाण मांडून आहेत. वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झालेले डॉ. मानकर याच ठिकाणी पदोन्नतीने अधीक्षक बनले; पण त्यांची बदली झाली नाही. 

मानसेवी अधिकारी डॉ. संतोष नैताम हे देखील सात ते आठ वर्षांपासून याच ठिकाणी कर्तव्य बजावतात. याच भागात त्यांचे दोन खासगी दवाखाने आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रात आलेल्या अनेक रुग्णांना राजरोसपणे खासगी दवाखान्यांत वळविले जाते. 

'लोकमत'ला पत्र पाठवून फोडली वाचा दरम्यान, अहेरी तालुक्यातील कमलापूर हे अतिदुर्गम व नक्षलप्रभावित गाव आहे. जिल्ह्यात नक्षल्यांनी प्रवेश केल्यानंतर ४० वर्षापूर्वी पहिली सभा याच गावात घेतली होती. राज्यातील एकमेव हत्ती कॅम्पही येथेच आहे. यामुळे हे गाव चर्चेत असते. येथील एका सुजाण वाचकाने 'लोकमत'ला पत्र लिहून गावातील आरोग्य केंद्रातील मनमानी कारभाराबाबत विस्तृतपणे कळवले. हे पत्र प्राप्त झाल्यानंतर 'लोकमत'ने र्सव बाबी पडताळल्या असता, त्यात तथ्य आढळले.

अनधिकृत परिचारिका शासकीय निवासस्थानांत यासोबतच तीन अनधिकृत महिला येथे परिचारिका म्हणून काम पाहतात. एवढेच नाही तर त्या शासकीय वसाहतींमध्ये राहत आहेत. त्यामुळे हा सगळा गैरप्रकार इतक्या राजरोसपणे चालतो तरी कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

"कमलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात असा काही गैरप्रकार होत असेल तर माहिती घेण्यात येईल. लोकाभिमुख सेवा देण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे अशा गोष्टी अजिबात खपवून घेतल्या जाणार नाहीत. याबाबत चौकशी केली जाईल. त्यात नेमके काय समोर येते, यावर कारवाईची दिशा ठरविण्यात येईल."- डॉ. प्रताप शिंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी

टॅग्स :Gadchiroliगडचिरोलीdoctorडॉक्टरHealthआरोग्य