मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत उमानूर ते मरपल्लीपर्यंतचे काम दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आले, तेव्हा रस्त्याच्या बाजूला कामाचे फलक सुद्धा लावण्यात आले होते; मात्र ते काम मुरूम व गिट्टी टाकून अर्ध्यावर सोडून देण्यात आले. उमानूर ते मरपल्लीपर्यंत ५ ते ६ किलोमीटर अंतरावर ठिकठिकाणी गिट्टी उखडून असल्याने रहदरीस अडचणी येत आहेत. रस्त्याचे काम जर पावसाळ्यापूर्वी झाले तर नागरिकांसाठी साेयीचे हाेईल, त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घालून मरपल्ली व उमानूरवासीयांची अडचण दूर करावी, अशी मागणी कार्तिक तोगम, प्रभाकर कोंडा्गुर्ले, दामिनी कोंडागुर्ले, माधुरी दुर्गे, प्रेमकुमार कोंडागुर्ले, तिरुपती कोंडागुर्ले, महिंद्रा कोंडागुर्ले, सुनील उंदीरवाडे, जगदीप कोंडागुर्ले, राजू कोंडागुर्ले, नवीन कोंडागुर्ले, दीपक सुनतकर, शंकर कोंडागुर्ले आदींनी केली आहे.
बाॅक्स
गंभीर अपघात घडल्यानंतर दुरुस्ती करणार काय?
उमानूर-मरपल्ली मार्गावरून वाहनांची बरीच वर्दळ असते. सदर रस्त्याची दुरवस्था झाल्याने दाेन वर्षांपूर्वी काम सुरू करण्यात आले. काम लवकर पूर्ण हाेईल, अशी अपेक्षा नागरिकांमध्ये हाेती;परंतु आशा धुळीस मिळाली.सध्या हा मार्ग खड्ड्यांनी जर्जर झाला आहे. त्यामुळे सदर काम पावसाळ्यापूर्वी लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. विशेष म्हणजे, गेल्या दोन वर्षांपासून रस्त्याचे काम प्रलंबित असल्याने रहदारीस अडचण येऊन येथे अनेक किरकाेळ अपघात घडले आहेत. रस्ता दुरुस्ती हाेईपर्यंत आणखी किती दिवस वाट पहावी लागणार? गंभीर अपघात घडल्यानंतर सदर रस्त्याची दुरुस्ती करणार काय, असा सवाल नागरिक करीत आहेत.
===Photopath===
250521\1422img-20210525-wa0012.jpg
===Caption===
दुरवस्थेत असलेला उमानूर-मरपल्ली मार्ग.