शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा असीम मुनीर म्हणजे दुसरा लादेन; अमेरिकेतूनच टीका होऊ लागली
2
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
3
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
4
यासिन मलिकच्या घरासह श्रीनगरमध्ये ८ ठिकाणी छापे; ३५ वर्षे जुन्या सरला भट्ट हत्या प्रकरणात कारवाई
5
अनेक वर्षांनी कार्यकर्ता भेटला तरी नावाने हाक मारणारे शरद पवार ‘ती’ नावे कसे विसरले?
6
"मला दोन मिनिटांतच समजेल..., भारतावर लादलेल्या टॅरिफने..."; अलास्कातील बैठकीपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतीन यांना थेट इशारा! 
7
सोने खरेदीची सुवर्णसंधी! एकाच दिवसात सोने १४०० रुपयांनी स्वस्त, ट्रम्प यांच्या घोषणेचा परिणाम!
8
"लग्न करायचंय, धर्म बदल"; प्रियकरानं टाकला दबाव, कुटुंबानं दिला त्रास, वैतागलेल्या तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल!
9
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
10
Asia Cup 2025 : जसप्रीत बुमराह खेळणार का? गिलसंदर्भात काय शिजतोय प्लॅन? जाणून घ्या सविस्तर
11
क्रिकेटपटू आकाशदीपने नवी कोरी फॉर्च्युनर घेतली; महागात पडली, डीलरही गोत्यात
12
IPL सट्टेबाजी: धोनीच्या १०० कोटींच्या मानहानीच्या दाव्याबाबत उच्च न्यायालयाची मोठी कारवाई
13
"भारताविरोधात माझा मुलगा लढेल, तो शहीद झाला तर नातू लढेल"; आसिम मुनीर अमेरिकेत जाऊन काय बोलले?
14
Maratha Morcha: ऐन गणेशोत्सवात मनोज जरांगे पाटील मुंबईत धडकणार; मराठा आंदोलकांच्या मोर्चामुळे ताण वाढणार!
15
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
16
उशिरा आयटी रिटर्न भरणाऱ्यांनाही रिफंड! करप्रणाली अधिक सोपी, पारदर्शक आणि आधुनिक होणार
17
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
18
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
19
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
20
'वीण दोघांतली ही तुटेना'चा पहिला एपिसोड पाहून काय म्हणाले प्रेक्षक, सोशल मीडियावर कमेंट्सचा पाऊस

वार्षिक दोन कोटी रोजगाराचे युकाँने सरकारला करून दिले स्मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 05:01 IST

देसाईगंज येथे युवक काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांमार्फत केंद्र शासनाला निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, नोटबंदीमुळे कृषी, लघुउद्योग, मध्यम उद्योगाला फटका बसला. जीएसटीमुळे कुटीरोद्योग व अन्य उद्योगधंद्यांना फटका बसून बेरोजगारी वाढली. देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. जीडीपीचा दरही उणे स्वरूपात घसरला आहे. पंतप्रधानांनी घोषित केलेल्या २० लाख कोटीच्या पॅकेजमध्ये बेरोजगारांना काहीच मिळाले नाही.

ठळक मुद्देतहसीलदारांमार्फत पंतप्रधानांना पाठविले निवेदन : देसाईगंज, कोरची, आरमोरी, सिरोंचा येथील कार्यकर्ते एकवटले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वार्षिक दोन कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन लोकसभा निवडणुकीपूर्वी देऊन सत्तेत आलेल्या केंद्र सरकारने रोजगार न देता असलेल्या नोकऱ्या हिरावल्या. त्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन केंद्र सरकारने पाळत वार्षिक दोन कोटी रोजगार द्यावा, या मागणीचे निवेदन युवक काँग्रेसने जिल्हाभर तहसीलदारांमार्फत केंद्र शासनाला पाठविले.देसाईगंज येथे युवक काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांमार्फत केंद्र शासनाला निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, नोटबंदीमुळे कृषी, लघुउद्योग, मध्यम उद्योगाला फटका बसला. जीएसटीमुळे कुटीरोद्योग व अन्य उद्योगधंद्यांना फटका बसून बेरोजगारी वाढली. देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. जीडीपीचा दरही उणे स्वरूपात घसरला आहे. पंतप्रधानांनी घोषित केलेल्या २० लाख कोटीच्या पॅकेजमध्ये बेरोजगारांना काहीच मिळाले नाही. उलट शासनाच्या जनविरोधी धोरणामुळे नोकºया गेल्या, केंद्र शासनाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा हट्ट धरला आहे. तसेच नीट व जेईई परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. गरीबांना मदत व उद्योगांना पॅकेजसुद्धा दिले नाही, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना युकाँ शहर अध्यक्ष पिंकू बावणे, विलास ढोरे, लतीफ रिजवी, नितीन घुले, सुनील सहारे, विक्की सिडाम, भारत गराडे, राकेश पुरणवार, विवेक गावळे, भूषण राऊत, प्रदीप बगमारे, नामदेव पत्रे, रितेश नागदेवे उपस्थित होते.कोरची येथे तहसीलदार छगनलाल भंडारी यांच्यामार्फत पंतप्रधानांना २ कोटी रोजगार उपलब्ध करण्याच्या मागणीचे निवेदन पाठविण्यात आले. निवेदन देताना युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहूल अंबादे, शहर अध्यक्ष मनोज सोनकुकरा, विरेंद्र जमकातन, रोशन कपुरडेरिया, आमीर शेख, देवा हारमे, ओमप्रकाश सुवा, चिंता सोनफुल, जितेंद्र विनायक, लवकुमार हारणे, परमेश्वर लोहंबरे उपस्थित होते.आरमोरी येथे तहसीलदारांमार्फत पंतप्रधानांना २ कोटी रोजगाराच्या मागणीचे निवेदन पाठविण्यात आले. निवेदन देताना आरमोरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मिलींद खोब्रागडे, विधानसभा क्षेत्र महासचिव नीलेश अंबादे, सारंग जांभुळे, सूरज भोयर, अक्षय मैंद, हेमचंद्र माकडे, संजय दुधबळे, अतुल सोमनकर, चेतन सोमनकर, तुषार नैताम, महेंद्र मने, भूपेश वाकडे, निखिल दुमाने, गोपाल रंधये, शुभम दुगा, खेमचंद्र चाटारे, रूपेश जवंजाळकर उपस्थित होते. निवेदन नायब तहसीलदारांनी स्वीकारले.सिरोंचा येथे तहसीलदार रमेश जसवंत यांच्यामार्फत पंतप्रधानांना युवक काँग्रेसच्या वतीने निवेदन पाठवून वार्षिक दोन कोटी रोजगार निर्मितीची मागणी करण्यात आली. निवेदन देताना युवक काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष आकाश परसा, तालुका उपाध्यक्ष नवाज सय्यद, दिनेश रेवेली, जतीन आदेपू, हरीष भट्टी, पवन येलेश्वरम, अभिलाष भट्टी आदी युवक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :Tahasildarतहसीलदारcongressकाँग्रेस