शहरं
Join us  
Trending Stories
1
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
2
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
3
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
4
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
5
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
6
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
7
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
8
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
9
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
10
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
11
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
12
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
13
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
14
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?
15
चंद्रग्रहण २०२५: तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ दान, धनवान बनाल; कल्याण होईल, सुख-सुबत्ता लाभेल
16
"गणित जुळलं की...", अभिनेत्री ऋतुजा बागवे लग्नाबद्दल स्पष्टच बोलली
17
DCM अजित पवार अन् पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यात नेमका काय झाला संवाद? वाचा शब्द न् शब्द
18
भारत, पाकिस्तान, अमेरिका अन् जपानमध्ये आपत्ती येणार; बाबा वेंगाची 'ती' भविष्यवाणी खरी होणार?
19
“...तोपर्यंत मराठा समाजाला कायमस्वरूपी टिकणारे आरक्षण मिळणार नाही”: बाळासाहेब थोरात
20
५०० वर्षांनी चंद्रग्रहणात शुभ योग: ५ राशींचे पंचक सुटेल, लाभ मिळेल; ४ राशींनी सावध राहावे!

उज्ज्वला गॅस योजनेतून महिलांना मिळाला सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 01:24 IST

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना गतवर्षीपासून अंमलात आणली. या योजनेअंतर्गत हजारो कुटुंबांना महिलांच्या नावे गॅस कनेक्शन देण्यात आले.

ठळक मुद्देखासदारांचे प्रतिपादन : कोटगल येथे उज्ज्वला पंचायत कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांसाठी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना गतवर्षीपासून अंमलात आणली. या योजनेअंतर्गत हजारो कुटुंबांना महिलांच्या नावे गॅस कनेक्शन देण्यात आले. यामुळे हजारो घरांचा स्वयंपाक धुरविरहीत होऊन या योजनेतून खऱ्या अर्थाने महिलांना सन्मान मिळाला, असे प्रतिपादन भाजपचे जिल्हाध्यक्ष खा. अशोक नेते यांनी केले.स्वस्थ आणि समृद्ध भारत निर्मितीसाठी शासनामार्फत अनेक जनकल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ नागरिकांना देण्यासाठी व जनसंपर्क वाढविण्यासाठी भाजपने १४ एप्रिलपासून ग्राम स्वराज अभियान सुरू केले आहे. हे अभियान ५ मे पर्यंत राबविले जाणार आहे. त्याअनुषंगाने २० एप्रिल रोजी शुक्रवारला गडचिरोलीनजीकच्या कोटगल येथे उज्ज्वला पंचायतीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून भाजपचे जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालवार, प्रशांत वाघरे, डॉ. भारत खटी, सरपंच भारत खोब्रागडे, उपसरपंच अमोल गद्देवार, मार्केटिंग अधिकारी विजयकुमार यादव, हेमंत मिश्रा, सुखदेव कोलते आदी उपस्थित होते.यावेळी उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत गॅस कनेक्शन वितरण मेळावा तसेच पात्र ग्राहकांची नोंदणी करून अभियानाची जागृती करण्यात आली. पुढे बोलताना खा. अशोक नेते म्हणाले, स्वयंपाकासाठी ओला लाकूड जाळण्यात येत असल्यामुळे नाका-तोंडाद्वारे धूर पोटात जातो. यातून अतिशय दुर्धर आजार महिलांना जडतात. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खास महिलांसाठी उज्ज्वला गॅस कनेक्शन योजना अंमलात आणली. सदर योजनेअंतर्गत सन २०१८-१९ या वर्षात जिल्ह्यातील महिलांना कनेक्शनचा लाभ देण्यात येणार आहे. एपीएल, बीपीएल कुटुंबातील महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खा. नेते यांनी यावेळी केले.कार्यक्रमाला धनराज भोयर, मंगला कबेवार, अर्चना खोब्रागडे, पर्वत कोरेवार, खुशाल भोयर, ममता दुधबावरे, गौतम वेस्कडे, बाळकृष्ण खोब्रागडे आदींसह गावातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नरेंद्र डोंगरे यांच्यासह पुरवठा विभागाचे कर्मचारी व एलपीजी गॅस कंपनीच्या प्रतिनिधींनी सहकार्य केले.१५० गॅस कनेक्शनचे वितरणप्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत खा. अशोक नेते व उपस्थित अन्य मान्यवरांच्या हस्ते या कार्यक्रमात सुनीता कबेवार, संगीता लोनबले, सुशील भोयर यांच्यासह १५० महिलांना गॅस कनेक्शनचे व सिलिंडरचे वाटप करण्यात आले. सदर गॅसचा वापर योग्य व काळजीपूर्वक करावा, असे आवाहन उपस्थित मान्यवरांनी संबंधित लाभार्थी महिलांना यावेळी केले.