गोपाल लाजूरकर, गडचिरोली
गडचिरोली : सरपण गोळा करण्यासाठी गावालगतच्या जंगलात गेलेल्या दोन महिलांना वेगवेगळ्या दिवशी वाघाने ठार केल्याची घटना बुधवार, १९ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजताच्या सुमारास देऊळगाव बुट्टी (ता. आरमोरी) येथे उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुक्ताबाई नेवारे (वय, ७०) व अनुसया जिंदर वाघ (वय,७०) अशी वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलांची नावे आहेत. मुक्ताबाई नेवारे ह्या बुधवारी सकाळी गावापासून अर्धा किमी अंतरावरील जंगलात सरपण गोळा करण्यासाठी गेल्या असता वाघाने त्यांना ठार केले, तर अनुसया जिंदर वाघ ह्या १२ नोव्हेंबरपासून बेपत्ता होत्या. नातेवाईकांकडून त्यांचा शोध घेतला जात होता. अशातच गडचिरोली- आरमोरी राष्ट्रीय महामार्गालगतच्या कांडेश्वर पहाडीलगत मृत प्राण्यांचा उग्रवास येत होता.
गावातील नागरिकांनी शोधमोहीम राबवली असता रात्री ८ वाजेच्या सुमारास अनुसूया जिंदर वाघ यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला, तर परिसरातच मुक्ताबाई निवारे या सुद्धा मृतावस्थेत आढळल्या. या घटनेची माहिती देऊळगावचे पोलिस पाटील मिथून कांदोळ यांनी आरमोरी पोलिसांना दिली. रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्यात आला.
Web Summary : Two women were killed in separate tiger attacks near Deulgaon Butti, Gadchiroli. Muktabai Neware died collecting firewood. Anusaya Wagh, missing since November 12th, was found dead. The incidents have created fear in the area.
Web Summary : गढ़चिरोली के देउलगांव बुट्टी के पास अलग-अलग बाघ हमलों में दो महिलाओं की मौत हो गई। मुक्ताबाई नेवारे की मौत लकड़ी इकट्ठा करते समय हुई। अनुसूया वाघ, जो 12 नवंबर से लापता थीं, मृत पाई गईं। घटनाओं से इलाके में दहशत है।