शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

सावरगावजवळ गिट्टीचे दोन ट्रक जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2020 6:00 AM

नागपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात ट्रकने अवैध गिट्टी आणली जात असल्याची गोपनीय माहिती गडचिरोलीचे तहसीलदार महेंद्र गणवीर यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार महसूल विभागाच्या पथकाने एमएच ४०, एके ५६५६ व एमएच ४० एके २५०० या क्रमांकाच्या ट्रकचा पाठलाग करून ही वाहने गडचिरोली तालुक्यातील धानोरा मार्गावरील सावरगावजवळ पकडली.

ठळक मुद्देट्रॅक्टरवरही कारवाई । गडचिरोली तहसीलदारांच्या पथकाने पाठलाग करून पकडले वाहन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गिट्टीची अवैध वाहतूक करणारे दोन ट्रक गडचिरोली तहसील कार्यालयाने जप्त केले. सदर कारवाई शनिवारी पहाटे महसूल विभागाच्या पथकाने गडचिरोली तालुक्यातील धानोरा मार्गावरील सावरगावजवळ केली.नागपूर जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्यात ट्रकने अवैध गिट्टी आणली जात असल्याची गोपनीय माहिती गडचिरोलीचे तहसीलदार महेंद्र गणवीर यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार महसूल विभागाच्या पथकाने एमएच ४०, एके ५६५६ व एमएच ४० एके २५०० या क्रमांकाच्या ट्रकचा पाठलाग करून ही वाहने गडचिरोली तालुक्यातील धानोरा मार्गावरील सावरगावजवळ पकडली. गिट्टीचा परवानाबाबत चालकाला विचारले असता त्यांच्याकडे परवाना आढळून आला नाही. त्यामुळे सदर ट्रक गडचिरोली तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहेत. हे ट्रक भिवापूर येथील रूचित पंदीलवार यांच्या मालकीचे आहेत. प्रत्येक ट्रकवर २ लाख ६० हजार रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.ही कारवाई गडचिरोलीचे तहसीलदार महेंद्र गणवीर यांच्या नेतृत्वात तलाठी महेश गेडाम, विनोद ढोरे, प्रफूल्ल चौधरी, संजय लाडवे, महेश चुणारकर यांनी केली.रेतीचा ट्रॅक्टर जप्तविहीरगाव येथील लोमेश मारोती वैरागडे यांच्या मालकीच्या एमएच ३३, एफ ४६६५ क्रमांकाच्या ट्रॅक्टरने रेतीची अवैध वाहतूक केली जात होती. ट्रॅक्टर चालकाकडे रेतीचा परवाना आढळून आला नाही. सदर ट्रॅक्टरही जप्त करण्यात आला आहे.