शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी दोन हजार किमीची पेट्रोलिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2019 12:21 AM

झाडाच्या फांद्या तुटून वीज तारांवर कोसळून वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात अधिक घडतात. मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्ती करताना महावितरणने वीज तारांवर आलेल्या झाडाच्या फांद्या तोडण्यावर विशेष भर दिला आहे.

ठळक मुद्देमान्सूनपूर्व नियोजन : अखंडित वीज पुरवठ्यासाठी महावितरणचे प्रयत्न; गंजलेले वीज खांब बदलविले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : झाडाच्या फांद्या तुटून वीज तारांवर कोसळून वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार इतर जिल्ह्यांच्या तुलनेत गडचिरोली जिल्ह्यात अधिक घडतात. मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्ती करताना महावितरणने वीज तारांवर आलेल्या झाडाच्या फांद्या तोडण्यावर विशेष भर दिला आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आलापल्ली व गडचिरोली विभागातील सुमारे २ हजार १९० किलोमीटर अंतर पेट्रोलिंग करून वीज तारांवर लोंबकळत असलेल्या झाडांच्या फांद्या तोडल्या आहेत. मात्र तरीही तांत्रिक बिघाडामुळे वीज प्रवाह खंडित होण्याचे प्रकार वाढल्यामुळे वीज ग्राहकांची ओरड सुरू झाली आहे.गडचिरोली जिल्ह्यातील बहुतांश वीज तारा जंगलातून गेल्या आहेत. काही ठिकाणी अगदी झाडाला रेटून वीज लाईन टाकण्यात आली आहे. वाढणाºया झाडाच्या फांद्या वीज तारांपर्यंत पोहोचतात. पावसाळ्यात वादळ आल्यानंतर झाडांच्या फांद्या वीज तारांना स्पर्श करतात. त्यामुळे झाडांमध्ये विद्युत प्रवाह सुरू होऊन दुर्घटना घडण्याची शक्यता राहते. झाडाच्या फांद्यांमुळे दोन वीज तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्यास स्पार्र्किंग होऊन वीज पुरवठा खंडीत होतो. गडचिरोली जिल्ह्यात झाडांमुळेच वीज पुरवठा खंडीत होण्याचे सर्वाधिक प्रकार घडतात.महावितरणच्या कर्मचाऱ्यांनाही पावसाळ्याच्या दिवसात बरीच धावपळ करावी लागते. यामुळे महावितरण मान्सूनपूर्व देखभाल व दुरूस्ती करताना वीज तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्या तोडण्यावर सर्वाधिक भर देत असल्याचे दिसून येते. मागील वर्षभरात वीज कर्मचाºयांनी गडचिरोली विभागात १ हजार ४६० किलोमीटर तर आलापल्ली विभागात ७३० किमीची पेट्रोलिंग करून वीज तारांवर आलेल्या झाडांच्या फांद्या तोडल्या आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर हे काम अधिक गतीने आणि ईमानदारीने होणे अपेक्षित असते. परंतू थोड्या वादळातही वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे हे काम योग्यप्रकारे झाली नाही की काय, अशी शंका वीज ग्राहकांकडून व्यक्त केली जात आहे.मुख्यालय सोडल्यास कारवाईगडचिरोली जिल्ह्यात पावसाळ्यात विजेमुळे अनेक दुर्घटना घडतात. बहुतांश वीज लाईन जंगलातून गेली आहे. त्यामुळे पाऊस किंवा वादळ आल्यानंतर वीज पुरवठा खंडीत होण्याचे प्रकार सुध्दा वाढतात. वीज उपकरणांमधील बिघाड वेळीच दुरूस्त व्हावा, यासाठी प्रत्येक वीज कर्मचाऱ्याला मुख्यालयी राहून सेवा देणे बंधनकारक करण्यात आले आहे. एखाद्या कर्मचाऱ्यांनी परवानगीशिवाय मुख्यालय सोडल्यास त्याच्यावर कारवाई करण्याचे निर्देश महावितरणने वरिष्ठ अधिकाºयांना दिले आहेत.४०० इन्सुलेटर बदलविलेएका खांबावरून दुसºया वीज खांबावर वीज तारा नेताना इन्सुलेटर हा अत्यंत महत्त्वाची भूमिका बजाविते. पावसाळ्यामध्ये इन्सुलेटर तुटण्याच्या घटना अधिक घडतात. इन्सुलेटर तुटल्यास वीज पुरवठा खंडीत होतो. वीज पुरवठा खंडीत न झाल्यास वीज तारांना वीज पुरवठा सुरू राहून तो खांबापर्यंत पोहोचून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे महावितरणने तुटण्याच्या स्थितीत असलेले २५० पिन इन्सुलेटर व १३६ डिस्क इन्सुलेटर बदलविले आहेत. ६९ ट्रान्सफार्मरचे आॅईल बदलविण्यात आले आहे. १५ ठिकाणचे डीटीसी केबल, १०५ क्षतिग्रस्त झालेले खांब बदलविण्यात आले आहेत. तसेच ९६ ठिकाणच्या वीज तारा ओढण्यात आल्या आहेत.वीज तारा तुटल्या असल्यास नागरिकांनी त्या तारांना स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नये. तुटलेल्या तारांची माहिती महावितरणला द्यावी. एखाद्या झाडावरून वीज तारा गेल्या असल्यास झाडात विद्युत प्रवाह येऊन दुर्घटना घडण्याची शक्यता राहते. त्यामुळे अशा झाडाची माहिती महावितरणला द्यावी. प्रत्येक वीज ग्राहकाचा फोन स्वीकारून लाईट ब्रेकडाऊन झाली असल्यास ती तत्काळ दुरूस्त करण्याच्या सूचना महावितरणच्या अधिकारी व कर्मचाºयांना दिल्या आहेत.- विजय मेश्राम,कार्यकारी अभियंता,महावितरण गडचिरोली