एटापल्ली (गडचिरोली) : एटापल्ली तालुक्याच्या रेकनार जंगल परिसरातून नक्षलविरोधी पथकाने दोन जहाल नक्षलवाद्यांना अटक केली. नीलेश पोटावी आणि अजित पुडो कसनसूर अशी त्यांची नावे आहेत.कोटमी पोलीस मदत केंद्रांतर्गत रेकनार जंगल परिसरात नक्षलविरोधी अभियान राबविले जात आहे. त्या वेळी पथकाला चार अनोळखी व्यक्ती साध्या वेशात संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आल्या. पोलीस दिसताच त्यांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी पाठलाग करून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता, ते जहाल नक्षलवादी असल्याचे निष्पन्न झाले. नीलेश पोटावी हा प्लाटून नं. ३ सदस्य असून कसनसूर हा एलओएसचा सदस्य आहे. या दोघांचाही एटापल्ली व धानोरा तालुक्यात खून, चकमक, जाळपोळ, काळे झेंडे लावणे आदी गुन्ह्यांत सहभाग असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)
दोन जहाल नक्षलवाद्यांना अटक
By admin | Updated: February 22, 2017 04:11 IST