लोकमत न्यूज नेटवर्कआलापल्ली : रस्त्याच्या बाजुला उभी असलेल्या दुचाकीला भरधाव दुचाकीने धडक दिल्याने या दुचाकीवरील एक ठार, दोघे जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी १.३० वाजता नागेपल्ली येथे घडली.नागेपल्ली येथील पेट्रोलपंपाजवळ रस्त्याच्या बाजुला एमएच ३३ एच ०५३१ या क्रमांकाची दुचाकी उभी ठेवण्यात आली होती. या दुचाकीला प्रभाकर व्यंका आलाम (५२) रा. टेकुलगुडा यांच्या दुचाकीने जोरदार धडक दिली. यामध्ये प्रभाकर आलाम यांचा जागीच मृत्यू झाला. तर कपील बंडू तलांडे (२२) रा. टेकुलगुडा व शंकर भगवान आत्राम (२०) रा. मेटीगुडम हे दोघे जखमी झाले. त्यांना अहेरी येथील उपजिल्हा रूग्णालयात भरती करण्यात आले. या अपघातात दुचाकीचा समोरचा भाग क्षतिग्रस्त झाला. पुढील तपास अहेरी पोलीस करीत आहेत.गडचिरोलीत रस्त्यावरच्या गायीमुळे अपघातगडचिरोली : इंदिरा गांधी चौकातून इंदिरानगरकडे जात असलेल्या दुचाकीच्या समोर अचानक गाय आडवी आल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. सदर घटना लांजेडा येथे सोमवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास घडली. सुधाकर पोवणवार (४०) रा. गुरवळा असे जखमीचे नाव आहे. सुधाकर हा इंदिरा गांधी चौकातून एमएच ३३ ए ११८७ क्रमाकांच्या दुचाकीने इंदिरानगरकडे जात होता. दरम्यान लांजेडा येथील शोरूमजवळ अचानक गाय समोर आली. त्यामुळे सुधाकर यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून दुचाकी खाली कोसळली. यामध्ये सुधाकर यांच्या डोक्याला गंभीर जखम झाली. ते बेशुध्द पडले. नागरिकांनी १०८ ची रूग्णवाहिका बोलवून जखमीला जिल्हा सामान्य रूग्णालयात भरती केले.
दुचाकीच्या धडकेने एक ठार, दोन जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 22:51 IST
रस्त्याच्या बाजुला उभी असलेल्या दुचाकीला भरधाव दुचाकीने धडक दिल्याने या दुचाकीवरील एक ठार, दोघे जखमी झाल्याची घटना सोमवारी दुपारी १.३० वाजता नागेपल्ली येथे घडली. नागेपल्ली येथील पेट्रोलपंपाजवळ रस्त्याच्या बाजुला एमएच ३३ एच ०५३१ या क्रमांकाची दुचाकी उभी ठेवण्यात आली होती.
दुचाकीच्या धडकेने एक ठार, दोन जखमी
ठळक मुद्देनागेपल्ली येथे अपघात : उभ्या दुचाकीला दुसऱ्या दुचाकीची धडक