वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार, १२ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:17 PM2019-05-20T23:17:01+5:302019-05-20T23:17:41+5:30

आलापल्ली-वेलगूर मार्गावरील रामय्यापेठा गावाजवळ झालेल्या अपघातात एक ठार आणि दोन जण जखमी तर मुलचेरा तालुक्यातील तुमरगुंडा ते दामपूर दरम्यानच्या वळणावर झालेल्या अपघातात एक वृध्द इसम ठार झाला आहे. तर कुरखेडा तालुक्यात झालेल्या अपघातामध्ये १० जण जखमी झाले.

Two killed and 12 injured in different accidents | वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार, १२ जखमी

वेगवेगळ्या अपघातांत दोन ठार, १२ जखमी

Next
ठळक मुद्देरूग्णालयात भरती : रामय्यापेठा, तुमरगुंडा, वासी, कुरखेडा जवळ अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली/मुलचेरा/कुरखेडा : आलापल्ली-वेलगूर मार्गावरील रामय्यापेठा गावाजवळ झालेल्या अपघातात एक ठार आणि दोन जण जखमी तर मुलचेरा तालुक्यातील तुमरगुंडा ते दामपूर दरम्यानच्या वळणावर झालेल्या अपघातात एक वृध्द इसम ठार झाला आहे. तर कुरखेडा तालुक्यात झालेल्या अपघातामध्ये १० जण जखमी झाले.
विक्रम मधुकर आत्राम (२५) रा. आलापल्ली व बिपीन बिजेंद्र हलदार (७०) रा. शांतीग्राम अशी मृतांची नावे आहेत. करण आत्राम (२४) व संतोष वेलादी (२५) दोघेही रा.आलापल्ली हे युवक जखमी झाले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, आलापल्ली येथील करण तुळशीराम आत्राम, विक्रम आत्राम, संतोष चुक्का वेलादी हे तीन युवक एकाच दुचाकीवर बसून आलापल्लीकडे रविवारी रात्री ८ वाजता येत होते. दरम्यान रामय्यापेठा गावाजवळ ट्रॅक्टरने दुचाकीला धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार विक्रम मधुकर आत्राम हा जागीच ठार झाला. तर करण आत्राम व संतोष वेलादी हे जखमी झाले. जखमींना अहेरी उपजिल्हा रूग्णालयात भरती करण्यात आले.
घटनेची माहिती मिळाल्यानंतर जि.प. उपाध्यक्ष अजय कंकडालवार, माजी आमदार दीपक आत्राम, जि.प. सदस्य अनिता आत्राम यांनी दवाखान्यात जाऊन जखमींची भेट घेतली. हे सुध्दा रूग्णालयात पोहोचले. विक्रम आत्राम हा माजी आमदार दीपक आत्राम यांचा पुतन्या आहे. विक्रमच्या पश्चात आई-वडील एक भाऊ व एक बहिण आहे. मृतकाचे वडील मधुकर मल्लाजी आत्राम यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल केला आहे. ट्रॅक्टरचा शोध पोलीस घेत आहेत. संतोष व करण यांना गडचिरोली रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.
मुलचेरा तालुक्यातील तुमरगुंडा ते दामपूर मार्गावरील वळणावर सोमवारी सकाळच्या सुमारास शेतात जात असलेल्या बिपीन बिजेंद्र हलदर (७०) रा. शांतीग्राम या वृध्द इसमाला एका अज्ञात वाहनाने धडक दिली. या धडकेत हलदार यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली. त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथील रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
वऱ्हाड घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटला
कुरखेडा : लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने आठ जण जखमी झाल्याची घटना कुरखेडा तालुक्यातील वासी गावाजवळच्या वळणावर सोमवारी सायंकाळच्या सुमारास घडली. भगवानपूर येथील काटेंगे परिवाराकडे लग्न होते. लग्नकार्य आटोपून वरात ट्रॅक्टरने धानोरा तालुक्यातील गट्टेपायलीकडे परत जात होती. वासी गावाजवळ ट्रॅक्टर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रॅक्टर रस्त्याच्या बाजुला जाऊन उलटले. या अपघातात धानू आतला (४८), मधुकर मडावी (७५), वासुदेव बोगा (३८), सोमा दुगा (४३), नानू बोगा (३७), चेंडू हलामी (५५) सर्व रा. गॅरापत्ती अशी जखमींची नावे आहेत. याच ट्रॅक्टरमध्ये कढोली येथील आठवडी बाजार आटोपून वासी येथे परत जाणाºया सुरेखा पुराम (३०), यशोदा पुराम (४०) या सुध्दा जखमी झाल्या. या सर्वांना कुरखेडा येथील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले.
दुचाकी अपघातात दोघे गंभीर
कुरखेडा : कुरखेडा-पुराडा मार्गावरील लेंढारी नाल्याजवळ दुचाकीला अपघात होऊन एक महिला व एक पुरूष जखमी झाले. दोघांनाही गडचिरोली येथे हलविण्यात आले आहे. कुरखेडा येथील दिलीप संघेल (५५), मैनाबाई पुळो (५०) हे दोघेही कुरखेडा येथून लग्न समारंभाकरिता लेंढारीकडे जात होते. १५ पोलीस शहीद झालेल्या लेंढारी नाल्यावरच असलेल्या गिट्टीच्या ढिगावरून दुचाकी घसरली. यामुळे दोघेही जमिनीवर कोसळले. दोघांनाही मार लागला. १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका बोलवून दोघांनाही सर्वप्रथम उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याने त्यांना गडचिरोली जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे.

Web Title: Two killed and 12 injured in different accidents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.