देसाईगंजात दोन कन्टेंमेंट झोन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2020 05:00 AM2020-06-22T05:00:00+5:302020-06-22T05:01:09+5:30

गांधी नगर येथील पूर्वेस रावजी मेश्राम यांचे घर, पश्चिमेला चक्रधर बनकर यांचे घर, उत्तरेला गुलाम आदी यांचे घर तर पश्चिमेला जिल्हा परिषदेच्या शाळेपर्यंतचा परिसर कन्टेंमेंट झोन म्हणून घोषित केले आहे. देसाईगंज येथे नवीन एसआरपीएफची बटालियन आली. या सर्वांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यापैकी एका जवानाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. उर्वरित सर्व जवानांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सर्व एसआरपीएफ जवानांना १४ दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले होते.

Two Containment Zones in Desaiganj | देसाईगंजात दोन कन्टेंमेंट झोन

देसाईगंजात दोन कन्टेंमेंट झोन

googlenewsNext
ठळक मुद्देखबरदारीचा उपाय : एकाच दिवशी आढळले होते पाच पॉझिटिव्ह कोरोना रूग्ण

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : देसाईगंज येथे शनिवारी एकाच दिवशी पाच कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने देसाईगंज शहरातील रेल्वे परिसर, गांधी नगराचा काही भाग कन्टेंमेंट झोन तर गांधीनगरचाच काही भाग बफर झोन म्हणून घोषित केला आहे.
देसाईगंज तालुक्यातील वेगवेगळ्या संस्थात्मक विलगीकरणात असलेला एक एसआरपीएफ जवान व इतर चार नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी मौजा विर्शीतुकूम अंतर्गत येणारा रेल्वे कॉलनीमधील रेल्वेस्टेशनचे प्रवेशद्वार, पुर्वेस वैनगंगा रेल्वे कॉलनी, दक्षिणेच रेल्वे प्लॅटफार्म तर पश्चिमेला रेल्वे तिकीट घरापर्यंतचा भाग कन्टेंमेंट झोन म्हणून घोषित केले आहे.
गांधी नगर येथील पूर्वेस रावजी मेश्राम यांचे घर, पश्चिमेला चक्रधर बनकर यांचे घर, उत्तरेला गुलाम आदी यांचे घर तर पश्चिमेला जिल्हा परिषदेच्या शाळेपर्यंतचा परिसर कन्टेंमेंट झोन म्हणून घोषित केले आहे. देसाईगंज येथे नवीन एसआरपीएफची बटालियन आली. या सर्वांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यापैकी एका जवानाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. उर्वरित सर्व जवानांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सर्व एसआरपीएफ जवानांना १४ दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले होते. दोन महिला नागपूरवरून देसाईगंज येथे आल्यानंतर त्यांना विलगीकरणात ठेवले होते. त्यापैकी एक महिला एक दिवस घरी राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी विलगीकरणात हलविले होते. या महिलेच्या संपर्कात आलेल्या तीव्र जोखमीच्या सर्व व्यक्तींना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

रूग्णाला घेऊन येणाºयाला केले क्वॉरंटाईन
आष्टी : पालघर जिल्ह्यातून आलेला एक युवक संस्थात्मक विलगीकरणात असताना कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. आरोग्य विभागाने त्याच्या प्रवासाची चौकशी केली असता, त्याने पालघर ते चंद्रपूरपर्यंत ट्रॅव्हल्सने प्रवास केला. ज्या ट्रॅव्हल्सने संबंधित रूग्णाने प्रवास केला, त्या वाहनचालकाला आरोग्य विभागाने क्वॉरंटाईन केले आहे. विशेष म्हणजे, सदर चालक हा आष्टी येथीलच आहे. तो तीन दिवस बाहेर फिरला. त्यामुळे त्याचा अनेकांशी संपर्क आला आहे. तो कोणाकोणाच्या संपर्कात आला याचा शोध आरोग्य विभागामार्फत घेतला जात आहे.

गोकुलनगरात प्रतिबंधीत क्षेत्र
गडचिरोली शहरातील गोकुलनगर येथील एक नागरिक गडचिरोली येथीलच एका खासगी दवाखाण्यात उपचार घेत होता. त्याला नागपूर येथे हलविले असता, तो कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला. सदर रूग्ण गोकुलनगरातील रहिवाशी आहे. त्यामुळे गोकुलनगराचा काही भाग प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. तसेच गडचिरो येथील ज्या रूग्णालयात तो उपचार घेत होता, त्या सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना रूग्णालयातच क्वॉरंटाईन करण्यात आले.

Web Title: Two Containment Zones in Desaiganj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.