शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील ५८० अपात्र शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द होणार; पगारही वसूल करणार?
2
मुंबईकरांचा लोकल प्रवास होणार 'सुपर कूल'; मध्य रेल्वेवर एसी लोकलच्या फेऱ्या वाढणार
3
राज्यपालांनी विधेयक अडवून धरल्यास राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाकडे यावे
4
Mehul Choksi: स्वित्झर्लंडला पळून जाण्याच्या तयारीत असतानाच ठोकल्या बेड्या
5
मुंबई-गोवा हायवे जूनपर्यंत पूर्ण होणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
6
Heat Wave in Maharashtra: महाराष्ट्रातील ‘हिल’ स्टेशन्सची वाटचाल ‘हीट’ स्टेशन्सकडे
7
Mumbai: खासगी टँकर, विहिरी आणि कूपनलिकांना मुंबई महापालिकेचा दिलासा
8
Mumbai Temperature: महामुंबई दिवसेंदिवस होतेय ‘ताप’दायक; पारा पोचला ४० अंशांपार
9
"आता टोलबद्दल तुमची तक्रार राहणार नाही, १५ दिवसांत नवीन पॉलिसी..."; नितीन गडकरींचे मोठं विधान
10
बिहार विजयाचे BJPचे स्वप्न धुसर होणार? बड्या मित्रपक्षाचा NDAला रामराम; INDIA आघाडीत जाणार!
11
“उद्धव ठाकरे यांना राऊतांपासून खरा धोका, तेच पक्ष चालवतात”; शिंदेंच्या नेत्याने सगळेच काढले
12
'मॅन ऑफ द मॅच' ठरल्यावर धोनीही सरप्राइज! नवा इतिहास रचला अन् कोहलीच्या विक्रमाशीही बरोबरी
13
"माझी आई मला म्हणाली होती, नितीन एवढा रस्ता चांगला कर; म्हणून मी आज...!" गडकरींनी सांगितली आईनं व्यक्त केलेली इच्छा
14
IPL 2025 LSG vs CSK : पंत चुकला! धोनी-शिवम दुबे जोडी जमली; ५ पराभवानंतर CSK नं अखेर मॅच जिंकली!
15
दोन दिव्यांग मुलांचे पालक तिसरे मूल दत्तक घेऊ शकतात -मुंबई उच्च न्यायालय
16
ग्लोव्ह्ज न काढता MS धोनीचा नॉन स्ट्राइक एन्डला डायरेक्ट थ्रो; माजी क्रिकेटर म्हणाले, हा 'तुक्का'च
17
बॉम्बने उडवून टाकेन! सलमानला धमकावणाऱ्याला मुंबई पोलिसांनी शोधून काढलं; समोर आली मोठी माहिती
18
"कायद्याचं उल्लंघन करण्याचा अधिकार कुणालाही नाही, धर्म..."; हिंसाचारानंतर, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केलं शांततेचं आवाहन 
19
“दिलेली वचने सरकार पूर्ण करत नाही, देश हळूहळू हिटलरशाहीकडे...”; प्रणिती शिंदेंची टीका
20
VIDEO: "कामं करा, असं का करता"; १४ वर्षांपूर्वी शपथ घेतलेल्या रामपालला पंतप्रधान मोदींनी घातले बूट

Gadchiroli | गोठणगाव नाक्यावर दोन पाेती गांजा जप्त, दाेघांना केली अटक

By दिगांबर जवादे | Updated: August 26, 2022 15:51 IST

कुरखेडावरून नागपूरला तस्करीचा प्रयत्न

कुरखेडा (गडचिराेली) : शहरातील गोठणगाव नाक्यावर गांजा या अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या चारचाकी वाहनाला अडवून वाहनाची तपासणी केली असता, वाहनात दाेन पाेत्यांमध्ये गांजा आढळून आला. गांजा व वाहन जप्त करीत पोलिसांनी दाेन आराेपींना अटक केली

मालेवाडा परीसरातून कुरखेडा मार्गे गांजाची तस्करी करण्यात येते अशी गाेपनीय माहीती कुरखेडा पोलिसांना मिळाली. मध्यरात्री मालेवाडा मार्गावरील गोठणगाव नाक्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी साहील झरकर यांचा मार्गदर्शनात कुरखेडा पोलिसांनी सापळा रचला होता. चारचाकी वाहन क्रमांक एम. एच. ४६ ए. एल. ६५४५ मालेवाडा मार्गाने येत असताना वाहनावर संशय आला. वाहन थांबवून झडती घेतली असता दाेन पाेत्यांमध्ये २४ किलो ७०० ग्राम सूखा गांजा आढळला. गांजाची किंमत २ लाख ४७ हजार रुपये एवढी हाेते. साेबत ३ लाख ५० हजार रुपये किमतीचे वाहन व २२ हजार रुपये किमतीचे दोन वापरते मोबाइल असा एकूण ६ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपी वैभव नरेश धूळस (३०)‌ व अनिरूद्ध देवानंद कांबळे (३१)‌ दोन्ही रा सिंगोरी ता. मौदा जि. नागपुर यांना अटक केली. सदर कुरखेडा तालुक्यातून नागपूर जिल्ह्यात नेला जात हाेता.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDrugsअमली पदार्थgadchiroli-acगडचिरोली