शहरं
Join us  
Trending Stories
1
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
2
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
3
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
4
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
5
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
6
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
7
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
8
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
9
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
10
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
11
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
12
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
13
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
14
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
15
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
16
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
17
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
18
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
19
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
20
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतींच्या १६५३ जागांसाठी सहा तालुक्यातून अडीच हजारांवर नामांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 05:00 IST

राज्य निवडणूक आयोगाने ऑफलाईन अर्ज दाखल करून घेण्यासाठी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मुदत वाढविली. तरीही सर्वच तहसील कार्यालयाबाहेर इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी कायम होती. त्यामुळे त्या सर्वाना आवाराच्या आत घेऊन मुख्य फाटक बंद करण्यात आले. फॉर्म घेण्यासाठी ३ ते ४ ग्रामपंचायत मिळून एक टेबल अशी व्यवस्था केली होती. एकेक उमेदवार संबंधित टेबलवर जाऊन आपला अर्ज देत होता.

ठळक मुद्देअर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी उमेदवारांची रात्री उशिरापर्यंत झुंबड

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : ग्रामपंचायत निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात निवडणूक होऊ घातलेल्या जिल्ह्याच्या उत्तर भागातील ६ तालुक्यात नामांकन दाखल करण्याचा बुधवारी शेवटचा दिवस होता. त्यामुळे संबंधित तहसील कार्यालयात एकच गर्दी उसळली. विशेष म्हणजे रात्री ९ वाजताही अर्जांची तपासणी करून ते स्वीकारण्याचे काम सुरूच होते.गडचिरोलीसह देसाईगंज, आरमोरी, धानोरा, कुरखेडा आणि कोरची या तालुक्यांमधील १९९ ग्रामपंचायतमधील १६५३ जागांकरिता सदर नामांकन भरण्यात आले. रात्री ९ वाजेपर्यंत २३७० अर्ज स्वीकारले होते. पूर्ण अर्ज स्वीकारण्यासाठी ११ वाजण्याची शक्यता तलसिल कार्यालयाच्या सुत्रांनी व्यक्त केली.राज्य निवडणूक आयोगाने ऑफलाईन अर्ज दाखल करून घेण्यासाठी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत मुदत वाढविली. तरीही सर्वच तहसील कार्यालयाबाहेर इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी कायम होती. त्यामुळे त्या सर्वाना आवाराच्या आत घेऊन मुख्य फाटक बंद करण्यात आले. फॉर्म घेण्यासाठी ३ ते ४ ग्रामपंचायत मिळून एक टेबल अशी व्यवस्था केली होती. एकेक उमेदवार संबंधित टेबलवर जाऊन आपला अर्ज देत होता. त्या टेबलवरील कर्मचारी अर्जाची तपासणी करून त्यातील त्रृटी काय आहेत त्या सांगून तो अर्ज स्वीकारत होते. त्यासाठी महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीला इतर विभागांच्या कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली होती.विशेष म्हणजे गेल्या चार दिवसात जेवढे अर्ज आले त्यापेक्षा जास्त अर्ज शेवटच्या दिवशी आल्याने रात्री ९ वाजतानंतरही सायंकाळी ५.३० वाजता कार्यालयाच्या आवारात असलेल्या इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्याचे काम सुरूच होते.नामांकन दाखल केलेल्या इच्छुाकांच्या अर्जातील त्रुटी गुरूवारी सकाळी ११ वाजताच्या आधी दूर करून अर्ज परिपूर्ण करावे लागणार आहे. 

आज अर्जांची छाननी, १५ ला मतदानपहिल्या टप्प्यासाठी येत्या १५ जानेवारीला मतदान होत आहे. यात ६ तालुक्यांचा समावेश आहे. गुरूवारी (दि.३१) सकाळी ११ वाजता अर्जांची छाननी सुरू होईल. त्यात किती अर्ज वैध आणि किती बाद झाले हे निश्चित होईल. त्यानंतर ४ जानेवारीपर्यंत नामांकन मागे घेण्याची मुदत आहे. त्याच दिवशी दुपारी ३ वाजतानंतर रिंगणात कायम असलेल्या उमेदवारांना चिन्हांचे वाटप होणार आहे. 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूक