शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
6
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
7
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
8
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
9
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
10
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
11
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
12
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
13
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
14
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
15
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
16
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
17
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
18
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
19
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

आष्टीत ट्रकभर गुळ जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 6:00 AM

ट्रक जप्त केल्यानंतर याची चौकशी केली असता, सदर गुळ छत्तीसगड राज्यातील रायपूर येथील प्रथम ट्रेडर्सचे मालक हर्षद जैन यांनी उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथील बन्सल ट्रेडींग कंपनीकडे बुक केला होता. कागदपत्रांवर धनलक्ष्मी ट्रेडर्स अहेरी यांच्याकडे माल पाठविला जात असल्याचे लिहिले होते.

ठळक मुद्देनऊ लाख रुपयांचा माल : अहेरीच्या दुकानदाराला केला जात होता पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : आष्टी पोलिसांनी ट्रकभर गुळ जप्त केला आहे. या गुळाची किंमत ९ लाख रुपये व ट्रकची किंमत १९ लाख रुपये असा एकूण २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदर कारवाई शनिवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास आष्टी येथील वनोपज नाक्यावर करण्यात आली.ट्रक जप्त केल्यानंतर याची चौकशी केली असता, सदर गुळ छत्तीसगड राज्यातील रायपूर येथील प्रथम ट्रेडर्सचे मालक हर्षद जैन यांनी उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर येथील बन्सल ट्रेडींग कंपनीकडे बुक केला होता. कागदपत्रांवर धनलक्ष्मी ट्रेडर्स अहेरी यांच्याकडे माल पाठविला जात असल्याचे लिहिले होते. त्यानुसार आष्टी पोलिसांनी धनलक्ष्मी ट्रेडर्सचे मालक संतोष मंचार्लावार यांना बोलवून चौकशी केली असता, त्यांनी हा माल आपला नसल्याचे सांगितले. पुन्हा चौकशी केली असता, सदर माल लक्ष्मी अनाज भंडार अहेरी यांच्या नावाने असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेत ट्रक चालक मोहम्मद हसन इस्लाम (४०), ट्रक क्लिनर मोहम्मद ताहीर नेहरूद्दीन ताहीर (२८) यांना अटक केली. चामोर्शी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याकरिता पोलिसांचे पथक उत्तर प्रदेशात रवाना करण्यात आले आहे. पोलिसांनी कलम १६१ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची कारवाई पोलीस निरिक्षक रजनिश निर्मल यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक जयदीप पाटील हे करीत आहेत. ट्रकमध्ये प्रत्येकी १९ किलो वजनाचे २ हजार ३११ बॉक्स आढळून आले.

टॅग्स :Policeपोलिस