शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आठवडाभर गारपीटीसह अवकाळीची शक्यता; शेतकऱ्यांनो सावध रहा....
2
सामाजिक विविधतेसाठी अधिक पोषक होतेय वातावरण; हिंदूंची संख्या घटली, मुस्लिमांची वाढली
3
बारामतीची निवडणूक संपली अन् पवार कुटुंबातला मुलगा, मुलीचा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कामय, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...
5
संपादकीय: शरद पवारांचा खडा अन् विरोधक उद्धव ठाकरेंच्या मागे लागले...
6
विवाह नोंदणी नाही तर प्राजक्ता माळीने 'या' कागदपत्रांवर केली सही, नेटकऱ्यांनी लावले अंदाज
7
इलेक्शन ड्युटी टाळण्यासाठी पुरुष शिक्षकाने गर्भवती असल्याचे भासवले; अधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले
8
आजचे राशीभविष्य - १० मे २०२४; इतर काही मार्गानी आर्थिक लाभ होतील, व्यवसायात प्रगती होईल
9
सलग ३४ वर्षे आमदार! सुरेशदादा जैन सक्रिय राजकारणातून निवृत्त; उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
10
एअर इंडियाचा संप मागे; 'ते' कर्मचारी कामावर
11
प्रियांका गांधी अखेर मैदानात उतरल्या! जिथे जिथे जातात...
12
दिंडोरीत अजित पवार नाराज, नंदुरबार-जळगावात शिंदे गट; असहकार्याने महायुतीत टेन्शन! 
13
आजी, माजी गृहमंत्री एकाच हॉटेलात मुक्कामी पण...दोघेही म्हणतात आम्ही एकमेकांना भेटलो नाही
14
खासदारकीसाठी कुणाकुणाला भेटलात, दावोसच्या गुलाबी थंडी काय केले? प्रियंका चतुर्वेदींना शिंदे सेनेचा सवाल
15
द्वेष नव्हे तर नोकरी निवडा; 'इंडिया' येणार अन् ३० लाख नोकऱ्या देणार
16
या समोरासमोर अन् एकदा काय ती चर्चा होऊनच जाऊद्या! माजी न्यायाधीशांचे पंतप्रधान अन् राहुल गांधींना आमंत्रण
17
प्रचारात मोदी टॉपवर; आतापर्यंत ८३ सभा! प्रचार करण्यात विरोधक जवळपासही नाहीत
18
साचलेले प्रश्न, दमलेले कार्यकर्ते, मरगळलेला प्रचार
19
सत्ताधारी वायएसआर काँग्रेसला अँटी इन्कम्बन्सीची भीती; सर्व जमिनींची नोंद 'या' पक्षाला महागात पडणार?
20
डॉ. दाभोलकर हत्या खटल्याचा आज निकाल; घटनेला १० वर्षे, अडीच वर्षे चालली सुनावणी

एटापल्ली तालुक्यातील बेरोजगार होणार ट्रक मालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2019 12:54 AM

एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावरील लोहखनिजाची लोह प्रकल्पापर्यंत वाहतूक करण्यासाठी आता एटापल्ली तालुक्यातल्याच बेरोजगारांना ट्रक मालक होण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी अवघ्या ५० हजारांच्या नाममात्र गुंतवणुकीतून अनेक बेरोजगारांना चक्क ३३ लाखांच्या ट्रकचे मालक होण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे.

ठळक मुद्देअवघ्या ५० हजारांची गुंतवणूक : राज्य शासन आणि लॉयड्स मेटल्स देणार मदतीचा हात

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : एटापल्ली तालुक्यातील सुरजागड पहाडावरील लोहखनिजाची लोह प्रकल्पापर्यंत वाहतूक करण्यासाठी आता एटापल्ली तालुक्यातल्याच बेरोजगारांना ट्रक मालक होण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी अवघ्या ५० हजारांच्या नाममात्र गुंतवणुकीतून अनेक बेरोजगारांना चक्क ३३ लाखांच्या ट्रकचे मालक होण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी सरकारच्या स्टार्ट अप इंडिया या कार्यक्रमातून कर्जपुरवठा केला जाणार आहे. यातून ३०० ते ४०० बेरोजगारांना रोजगार-स्वयंरोजगार देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.लॉयड्स मेटल्स आणि राज्य सरकारच्या संयुक्त पुढाकाराने एटापल्ली तालुक्यातील अनुसूचित जमाती व जातीच्या १०० महात्वाकांक्षी तरुणांना ट्रक मालक बनविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.३३ लाखांच्या १४ चाकी ट्रकसाठी लॉयड्स मेटल्स प्रत्येकी २ लाख आणि राज्य सरकार २ लाख असे अर्थसहाय्य देणार आहे. याशिवाय मागास घटकांसाठी असलेल्या ‘डिक्की’ योजनेतून ४० टक्के सबसिडी दिली जाणार आहे. उर्वरित रक्कम बँक आॅफ इंडियाकडून कर्जस्वरूपात दिली जाईल. त्यासाठी गॅरंटीची जबाबदारी कंपनी घेणार आहे.गेल्या महिन्यात झालेल्या लोहखाणीच्या ट्रक आणि बस अपघातात ४ लोकांचा बळी गेला होता. आतापर्यंत लोहखनिजाच्या वाहतुकीसाठी कंत्राटदाराकडून ट्रक लावले जात होते. चालकाच्या बेजबाबदार वाहतुकीवर नागरिकांचा रोष होता. आता स्थानिक युवकच ट्रकचे मालक आणि चालक होणार असल्यामुळे ते अधिक जबाबदारीने गाड्या चालवतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.मुख्यमंत्र्याच्या हस्ते शुभारंभविशेष म्हणजे या अनोख्या उपक्रमासाठी मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेतला असून सोमवारी काही बेरोजगार युवकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ट्रकची चावी देऊन शुभारंभ होणार आहे. या ट्रकचा वापर घुग्गुस आणि पुढे कोनसरी येथे लोहखनिजाची वाहतूक करण्यासाठी होणार आहे. त्यासाठी मिळणाऱ्या भाड्यातून बँकेचा हप्ता भरला जाईल.