रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या नादुरुस्त क्रेनला ट्रकची धडक; चालक जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2020 10:45 AM2020-09-10T10:45:15+5:302020-09-10T10:45:39+5:30

टोमॅटोचे क्रेटस भरून आष्टीकडे येत असलेल्या ट्रकची धडक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या क्रेनला होऊन त्यात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना येथे गुरुवारी पहाटे ४ च्या सुमारास घडली.

Truck hit a faulty crane standing on the side of the road; The driver was killed on the spot | रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या नादुरुस्त क्रेनला ट्रकची धडक; चालक जागीच ठार

रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या नादुरुस्त क्रेनला ट्रकची धडक; चालक जागीच ठार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: टोमॅटोचे क्रेटस भरून आष्टीकडे येत असलेल्या ट्रकची धडक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या क्रेनला होऊन त्यात ट्रक चालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना येथे गुरुवारी पहाटे ४ च्या सुमारास घडली.
ट्रक क्र. ए.पी.-03, टी. ई.2469 हा अनखोडा ते उमरी मार्गावर असलेल्या नाल्याजवळ पहाटे चारच्या सुमारास बंद पडलेल्या क्रेनवर धडकला. ही धडक इतकी भीषण होती की, चालक नीरजकुमार राम अभिलाष (२८) हा जागीच ठार झाला.

Web Title: Truck hit a faulty crane standing on the side of the road; The driver was killed on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात