१६ नोव्हेंबरला आयोजन : विनायक तुमराम यांची माहितीगडचिरोली : आदिवासी धर्मानुसंधान ट्रस्ट बल्लारपूर जिल्हा चंद्रपूरच्या वतीने गडचिरोली तालुक्यातील दिभना माल येथे १६ नोव्हेंबर रोजी विशाल आदिवासी धर्म/निसर्ग धर्माची प्रस्थापना तथा स्वधर्म स्वीकार समारोह आयोजित करण्यात आला असून या आदिवासी धर्माची समाजबांधवांना दीक्षा देण्यात येणार आहे, अशी माहिती आदिवासी साहित्य व संस्कृती संवर्धन संस्थेचे अध्यक्ष प्रा. डॉ. विनायक तुमराम यांनी शनिवारी गडचिरोली येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. आदिवासी धर्म व धर्मस्विकार कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून भंते नागार्जुन सुरेई ससाई राहतील. स्वागताध्यक्ष म्हणून आदिवासी साहित्यकार वाहरू सोनवने तर अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. विनायक तुमराम राहतील. विशेष अतिथी म्हणून धर्मगुरू फादर अन्थोनी डिसुजा, डॉ. मोहम्मद आझम, मिल्कीतसिंग बल, डॉ. श्रीपाल सबनिस, डॉ. पंडित राकेश शास्त्री, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरूषोत्तम खेडेकर आदी उपस्थित राहणार आहेत.यावेळी झारझंडचे माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा, महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, विद्यमान मंत्री विष्णू सवरा यांचा गौरव करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री शिवाजीराव मोघे, खा. अशोक नेते, माजी शिक्षण मंत्री प्रा. वसंत पुरके, पद्माकर वळवी, माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम, आ. डॉ. देवराव होळी, माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
दिभनात आदिवासी धर्म समारोह
By admin | Updated: October 23, 2016 01:41 IST