शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास ठरतोय धोक्याचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 00:10 IST

गडचिरोली-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर दिवस-रात्र वाहनांची वर्दळ असते. या वर्दळीत वाहनचालकांना निश्चित ठिकाणी पोहोचण्याच्या घाईत आपला जीव गमवावा लागतो. शिवाय वाहनात असलेल्या प्रवाशांनाही अनेकदा आपल्या प्राणास मुकावे लागते.

ठळक मुद्देअपघात वाढले । गडचिरोली-आरमोरी मार्गावर काटली, मोहझरी, पोर्ला, चुरमुरा, देऊळगाव अपघातप्रवण स्थळ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गडचिरोली-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर दिवस-रात्र वाहनांची वर्दळ असते. या वर्दळीत वाहनचालकांना निश्चित ठिकाणी पोहोचण्याच्या घाईत आपला जीव गमवावा लागतो. शिवाय वाहनात असलेल्या प्रवाशांनाही अनेकदा आपल्या प्राणास मुकावे लागते. गेल्या दोन ते तीन वर्षांत या ३४ किमी मार्गावर अनेक किरकोळ व गंभीर अपघात घडल्याने अनेकांचा बळी गेला आहे. दिवसेंदिवस राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास धोक्याचा ठरत आहे.गडचिरोली-आरमोरी या राष्ट्रीय महामार्गावरून २४ तास वाहनांची वर्दळ असते. या मार्गावर जवळपास १० गावे रस्त्याला लागून आहेत. विशेष म्हणजे मार्गावरील एकाही गावालगत गतिरोधक नाही. त्यामुळे दुचाकी, चारचाकी वाहनांसह अवजड वाहनेही सुसाट पळविली जातात. दिवस-रात्र हा वेग कायम असतो. वाहनचालकांना निश्चित स्थळी पोहोचण्याची घाई नेहमीच राहत असल्याने किरकोळ व गंभीर स्वरूपाच्या घटना घडत असतात. अवजड वाहनांसह एसटी महामंडळाच्या बसेसही सुसाट चालविल्या जातात. विशेषत: परस्पर विरूद्ध दिशेने वाहने येतानाही ओव्हरटेक करून आपले वाहन समोर कशाप्रकारे नेता येईल, या हेतूने वाहने चालविली जात असल्याने अपघात घडतात. परस्पर विरूद्ध दिशेने वाहन येऊन जोरदार धडक झाल्यास गंभीर स्वरूपाचा अपघात घडतो.गडचिरोली तालुक्यातील खरपुंडी फाटा, गोगाव फाटा, पाल नदीलगतचे वळण त्यानंतर साखरा, काटली, नगरी फाट्यालगतचे वळण, मोहझरीलगतचे चढते वळण, पोर्ला बसथांबा, वडधा मार्ग फाटा, वसा, चुरमुरा, किटाळीलगतचे वळण, देऊळगावनजीकचे वळण, खोब्रागडी नदी पूल, वैरागड फाटा, गाढवी नदीलगतचे वळण, आरमोरी स्मशानभूमीकडे जाणारा फाटा तसेच आरमोरी शहरातील मुख्य मार्ग आदी ठिकाणे अपघातप्रवण स्थळ बनली आहेत. चार वर्षांपूर्वी साखरा, किटाळीजवळ काळीपिवळीला अपघात होऊन काही लोकांचा बळी गेला. तर काहींना गंभीर जखमी व्हावे लागले होते. देऊळगावनजीकच्या वळणावर चारचाकी वाहनाला अपघात होऊन एकाच कुटुंबातील चार व्यक्तींना आपल्या जीवाला मुकावे लागले होते.मागील वर्षी चुरमुराजवळ कृषी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे चारचाकी वाहन रस्त्यावर उभ्या असलेल्या टिप्परला रात्रीच्या सुमारास धडकल्याने सहा विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला होता. याशिवाय नवीन वर्षात कठाणी नदीच्या नवीन पुलावर दुचाकीला अपघात होऊन चालकाचा मृत्यू झाला. तसेच जुन्या पुलावरून आॅटोवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने आॅटो नदीपात्रात कोसळून चालकाचा मृत्यू झाला. तर अनेक प्रवाशी गंभीर जखमी झाले होते. या ३४ किमी मार्गावर दिवसेंदिवस अपघाताच्या घटना वाढत असल्याने मार्ग धोकादायक ठरत आहे.मोहझरीजवळ दीड महिन्यात दुसरा अपघातगडचिरोली-आरमोरी राष्ट्रीय महामार्गावरील काटली-मोहझरीदरम्यान नेहमीच अपघात घडत असतात. यात किरकोळ व गंभीर स्वरूपाच्या अपघातांचा समावेश असतो. २०१९ मध्ये २१ मार्च रोजी धुलीवंदनाच्या दिवशी दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात काळी-पिवळी वाहनानाची झाडाला जबर धडक बसली. यामध्ये दोघे ठार तर १२ प्रवासी जखमी झाले होते. विशेष म्हणजे दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास हा अपघात घडला होता. त्यानंतर आता शुक्रवार ३ मे रोजी काटलीजवळ दुपारी २.३० वाजताच्या दरम्यान एसटी महामंडळाच्या बसने बांबू भरलेल्या ट्रकला जबर धडक दिल्याने चालकासह तिघेजण जखमी झाले. ओव्हरटेक करण्याच्या नादात सदर अपघात घडल्याचे प्रवाशांमध्ये चर्चा होती.

टॅग्स :Accidentअपघात