लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : विधानसभा निवडणुकीसंदर्भात येथील नगर परिषदेच्या सभागृहात निवडणुकीचे काम सांभाळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तीन दिवस प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट हाताळण्याबाबतची माहिती देण्यात आली.आरमोरी विधानसभा मतदार संघाअंतर्गत २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान तीन दिवस येथील नगर परिषदेच्या सभागृहात कर्मचाºयांचे निवडणूक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या प्रशिक्षणाला भेट देऊन अधिकारी व कर्मचाºयांना मार्गदर्शन केले. सदर विधानसभा निवडणुकीत मतदान प्रक्रिया यशस्वी होऊन मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी कर्मचाºयांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.प्रशिक्षणाच्या पहिल्या टप्पय्यात व्हीव्हीपॅट, बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आदींची माहिती प्रात्यक्षिकांसह देण्यात आली. मतदार यादीतील आपला अनुक्रमांक, यादीतील भाग क्रमांक आदींबाबतची माहिती कर्मचाºयांना देण्यात आली.
निवडणूक कामाचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2019 05:00 IST
विधानसभा निवडणुकीसंदर्भात येथील नगर परिषदेच्या सभागृहात निवडणुकीचे काम सांभाळणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना तीन दिवस प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी ईव्हीएम मशीन व व्हीव्हीपॅट हाताळण्याबाबतची माहिती देण्यात आली. आरमोरी विधानसभा मतदार संघाअंतर्गत २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान तीन दिवस येथील नगर परिषदेच्या सभागृहात कर्मचाºयांचे निवडणूक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
निवडणूक कामाचे प्रशिक्षण
ठळक मुद्देमाहिती जाणली : ईव्हीएम व व्हीव्हीपॅट हाताळण्याचे प्रात्यक्षिक