२५ गावांच्या रहदारीची समस्या सुटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2020 05:00 AM2020-07-06T05:00:00+5:302020-07-06T05:01:16+5:30

दोन वर्षांपूर्वी पुलाच्या बांधकामाला शासनाने परवानगी दिली. त्यासाठी ४ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. मागील वर्षीपासून कंत्राटदाराने कामाला सुरूवात केली होती. वर्षभरात पुलाचे काम अतिशय वेगाने केल्याने सदर काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. पिलर पुलाच्या स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. कठडे निर्माण करण्याचे काम शिल्लक आहे. तसेच पुलाला जोडणारे जोड रस्त्यांचेही काम शिल्लक आहे.

The traffic problem of 25 villages was solved | २५ गावांच्या रहदारीची समस्या सुटली

२५ गावांच्या रहदारीची समस्या सुटली

Next
ठळक मुद्देवाहनांची ये-जा सुरू : किष्टापूर नाल्यावरील पुलाचे काम अंतिम टप्प्यात

लोकमत न्यूज नेटवर्क
जिमलगट्टा : किष्टापूर नाल्यावरील पुलाचे काम अंतिम टप्प्यात आहे. पावसाळ्यादरम्यान वाहतूक व्हावी, यासाठी सदर पूल रहदारीस मोकळा करून देण्यात आला आहे. त्यामुळे किष्टापूर परिसरातील २५ गावातील नागरिकांसाठी सोयीचे झाले आहे.
किष्टापूर नाल्याच्या पलिकडे २५ गावे आहेत. या सर्व गावांना किष्टापूर नाला ओलांडूनच जिमलगट्टा किंवा अहेरी तालुकास्थळ गाठावे लागत होते. अनेक नागरिक पावसाळ्यात जीव धोक्यात घालून नाला भरलेला असतानाही प्रवास करीत होते. त्यामुळे जीवितास धोका होता. तसेच आजारी पडलेल्या व्यक्तीला दवाखाण्यात भरती करण्यासही अडचण निर्माण होत होती. २५ गावातील व्यवहार पावसाळ्यादरम्यान जवळपास ठप्पच पडत होते. नाल्यावर पुलाची निर्मिती करण्याची मागणी अतिशय जुनी असली तरी शासन त्याकडे लक्ष देत नव्हते.
दोन वर्षांपूर्वी पुलाच्या बांधकामाला शासनाने परवानगी दिली. त्यासाठी ४ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. मागील वर्षीपासून कंत्राटदाराने कामाला सुरूवात केली होती. वर्षभरात पुलाचे काम अतिशय वेगाने केल्याने सदर काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. पिलर पुलाच्या स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. कठडे निर्माण करण्याचे काम शिल्लक आहे. तसेच पुलाला जोडणारे जोड रस्त्यांचेही काम शिल्लक आहे.
पावसाळ्यात नाल्याला पाणी राहत असल्याने नागरिकांसाठी अडचणींचे होऊ नये, यासाठी कंत्राटदाराने जोड रस्त्यावर काही प्रमाणात मुरूम टाकला आहे. त्यामुळे चारचाकी किंवा दुचाकी वाहन पूल पार करू शकते. सदर पूल झाल्याने नागरिकांसाठी सोयीचे झाले आहे.
 
Web Title: The traffic problem of 25 villages was solved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.