शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुणबी प्रमाणपत्र,व्हॅलिडिटीचा प्रश्न सोडवा'; धाराशिवमध्ये सरनाईकांना मराठा तरुणांचा घेराव!
2
Mallikarjun Kharge : "४२ देश फिरले, पण मणिपूरला एकदाही नाही गेले", मल्लिकार्जुन खरगेंचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
3
“राज ठाकरेंसोबत जो जाईल, तो संपेल, तेच मराठीचा अनादर करतात”; आणखी एका भाजपा खासदाराची टीका
4
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...
5
“दिवस निवड, वेळ अन् जागा तुझी, कुठे येऊ ते फक्त सांग”; मनसे नेत्यांचे निशिकांत दुबेंना आव्हान
6
बजाजची साथ सोडून अंबांनींसोबत आली ही दिग्गज जर्मन विमा कंपनी, लाखो कोटींच्या व्यवसायावर नजर
7
“विधानभवनातील मारामारीला CM फडणवीसच जबाबदार, हनीट्रॅपचे धागेदारे...”: हर्षवर्धन सपकाळ
8
IND vs ENG: आमची बरोबरी करायची असेल तर तुमची खरी ताकद दाखवा; इंग्लंडच्या दिग्गजाचा टीम इंडियाला सल्ला
9
'त्याचं तोंड उघडत नाहीये'; पत्नीचे दिरासोबत प्रेमसंबंध; भावाला चॅट सापडले अन् समोर आला हत्येचा कट
10
"सॉरी, मी आता जगू शकत नाही, त्यांनी मला..."; फेल करण्याची धमकी, विद्यार्थिनीचं टोकाचं पाऊल
11
सुझलॉनमध्ये पैसे गुंतवलेत? आता झालाय मोठा बदल, गुंतवणूकदारांना माहीत असणं गरजेचं
12
OnePlus: वनप्लसच्या लेटेस्ट 5G फोनवर तगडी ऑफर, किंमत पाहून खूश व्हाल!
13
पाकिस्तानमध्ये अजब घोटाळा! डिलिव्हरी न करता अब्जावधींचे पेमेंट; कपडे अन् शूजवर पाण्यासारखे पैसे वाया गेले
14
Sonam Raghuwanshi : राजाच्या हत्येनंतर १४ दिवस फ्लॅटमध्ये काय करत होती सोनम? चौकशीदरम्यान मोठा खुलासा
15
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
16
शर्यतीच्या नादात पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने दोघांचा उडवलं; बापाने चोप देत पोलिसांकडे सोपवलं
17
...अन् कोट्यवधींच्या अलिशान कारमधून फिरणारा चहल बुलेटचा ठोका ऐकून झाला थक्क (VIDEO)
18
Karur Vysya Bank Ltd Bonus Share: चौथ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; २५ जुलैपूर्वी होणार निर्णय, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
19
कोर्टात लव्ह मॅरेज, लग्नानंतर सातत्याने भांडण; Video रेकॉर्ड करून युवकानं जीवन संपवलं
20
'माफी मागा...', एअर इंडिया विमान अपघाताच्या बातमीवर वैमानिकांनी डब्ल्यूएसजेला नोटीस पाठवली

दारूबंदीच्या १४१ कारवाया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 23:41 IST

दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान हातभट्टीच्या दारूसह देशी-विदेशी दारूची वाहतूक रोखण्यात पोलीस यंत्रणेला बऱ्यापैकी यश आले. मतदानाच्या दिवसापर्यंत जिल्हाभरात १० हजार ३४० लिटर दारू जप्त करून १४१ गुन्हे दाखल करण्यात आले.

ठळक मुद्देदारूमुक्त निवडणुकीला पाठबळ : १०,३४० लिटर दारू व १.२४ कोटी मुद्देमालही जप्त

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान हातभट्टीच्या दारूसह देशी-विदेशी दारूची वाहतूक रोखण्यात पोलीस यंत्रणेला बऱ्यापैकी यश आले. मतदानाच्या दिवसापर्यंत जिल्हाभरात १० हजार ३४० लिटर दारू जप्त करून १४१ गुन्हे दाखल करण्यात आले. यात विविध वाहनांसह १ कोटी २४ लाख रुपयांचा ऐवज विविध ठाण्यात जमा करण्यात आला आहे.जिल्ह्यात आधीच दारूबंदी, त्यामुळे मद्यपी लोकांना या गोष्टीचे मोठेच अप्रुप आहे. याचा फायदा घेत राजकीय पक्षांकडून मतदारांना दारूचे प्रलोभन दाखवून मते मिळविण्याचा प्रयत्न होतो. ही बाब टाळून यावेळची निवडणूक दारूमुक्त करण्याचा संकल्प करून मुक्तिपथ गाव संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही पुढाकार घेत जनजागृती केली. पोलिसांनीही ठिकठिकाणी नाकेबंदी करून दारू वाहतुकीला आळा घातला. एवढेच नाही तर काही ठिकाणी सराईत दारू विक्रेत्यांना मतदान होईपर्यंत तडीपार करण्यात आले. परिणामी बºयाच प्रमाणात दारू वाहतूक आणि विक्रीवर आळा बसला.विशेष म्हणजे पोलीसच नाही तर वाहनांमधून रोकड वाहतूक केली जाते का याचीही तपासणी अनेक पथकांकडून होत असल्याने दारू वाहतूक करणे कठीण झाले. दारूचा पुरवठा करणारी अनेक वाहने पकडल्या जाऊन दारू विक्री जवळजवळ बंद होती.जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शेखर सिंह यांनी विविध यंत्रणांचा योग्य वापर करून कठीण वाटत असलेले हे काम सोपे करून निवडणूक निर्विघ्नपणे पार पाडण्यात यश मिळविले.आॅपरेशन हिंमत’मुळे वाढला मतांचा टक्कागडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघात मतदानाची अंतिम टक्केवारी ७१.९८ टक्के झाली. पहिल्या टप्प्यात विदर्भात झालेल्या मतदानात ही टक्केवारी सर्वाधिक आहे. नक्षलग्रस्त भाग असताना हे कसे शक्य झाले? हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय झाला आहे.नक्षलदृष्ट्या संवेदनशिल आणि अतिसंवेदनशिल असलेल्या भागातील मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया निर्विघ्नपणे पार पाडणे मोठे आव्हानात्मक होते. अशा स्थितीत नक्षलवाद्यांच्या कारवाया यशस्वी होऊ नये यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी ‘आॅपरेशन हिंमत’चे नियोजन केले.उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे यांच्या मार्गदर्शनात आॅपरेशन हिंमत अंतर्गत दुर्गम व अतिदुर्गम भागात ५९१ गावांना ग्रामभेटी आणि ६१ जनजागरण मेळाव्यांच्या माध्यमातून आदिवासी नागरिकांमध्ये मतदानाबद्दल जनजागृती निर्माण केली.जिल्ह्यात कार्यरत सी-६० पथक, केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पाच बटालियनसोबत बाहेर जिल्ह्यातून १० हजार जवानांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी होता. मात्र तरीही दोन ठिकाणी भूसुरुंगांचा स्फोट घडविण्यात नक्षली यशस्वी झाले. त्यात चार जवानही जखमी झाले. एवढेच नाही तर मतदानावरून परतणाºया जवानांवर फायरिंगसुद्धा झाली.अशा बिकट स्थितीतही मागे न हटता पोलीस, निवडणूक प्रशासन, केंद्रांवर ड्युटी लागलेले हजारो कर्मचारी यांनी समन्वयातून मार्ग काढत सर्व केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया राबविली. यंत्रणांच्या प्रयत्नांना नागरिकांनीही तेवढाच चांगला प्रतिसाद देत ‘आॅपरेशन हिंमत’ यशस्वी करण्यास हातभार लावला. 

टॅग्स :liquor banदारूबंदी