शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोली जिल्ह्यात वादळी पावसाचा तडाखा, अनेक घरांची पडझड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2018 21:17 IST

गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यांमध्ये बुधवारी रात्री व गुरूवारी सकाळी झालेल्या जोरदार वादळाने आणि अवकाळी मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. काही ठिकाणी झाडे उन्मळून घरांवर पडल्याने घरांचे नुकसान झाले. 

 गडचिरोली  - गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागातील तालुक्यांमध्ये बुधवारी रात्री व गुरूवारी सकाळी झालेल्या जोरदार वादळाने आणि अवकाळी मुसळधार पावसामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. काही ठिकाणी झाडे उन्मळून घरांवर पडल्याने घरांचे नुकसान झाले. 

अहेरी येथे गुरूवारी सकाळी विजांच्या कडकडाटासह वादळ व पावसाला सुरूवात झाली. यामुळे अनेक दुकानांची फलके तुटून पडली. अनेक दुकानांत तसेच घरात, आदिवासी विकास महामंडळ, ट्रेझरी कार्यालय येथे पावसाचे पाणी शिरले. जवळपास ४५ मिनिटे जोरदार पावसाने हजेरी लावली. अहेरी बायपास मार्गावरील विजेची तार तुटून पडल्याने अहेरी शहराचा वीज प्रवाह खंडीत झाला. रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेकांच्या चारचाकी व दुचाकी बंद पडल्या. 

कमलापूर परिसरात घरावरील पत्रे, कवेलू, टिन उडाले. विद्युत तारांवर झाडे कोसळल्याने विद्युत पुरवठा खंडीत झाला. जिमलगट्टा येथे अनेक घरांवर तसेच जंगलात अनेक ठिकाणी झाडे पडल्याने देचलीपेठा, उमानूर भागातील वीज पुरवठा खंडीत झाला.एटापल्ली येथे सकाळी ११.३० ते १२ वाजेपर्यंत जोरदार पाऊस झाला. पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. एटापल्ली तालुक्यातील काही शेतकरी आवत्या टाकतात. त्यामुळे आवत्यासाठी जमीन नांगरता येणार आहे.कोरची तालुक्यात गुरूवारी सकाळपासून पावसाच्या मध्यम सरी पडल्या. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. कोरची तालुक्यातही  बुधवारी रात्री काही भागात वीज गर्जनेसह पाऊस झाला. सिरोंचा येथे बुधवारी रात्री व गुरूवारी दुपारी १२ ते १.३० वाजेदरम्यान जोरदार पाऊस झाला. रात्रीपासून वीज पुरवठा खंडीत झाल्याने संपूर्ण रात्र अंधारातच काढावी लागली.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीRainपाऊस