शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

२०२१ पर्यंत प्रत्येक घरी राहणार शौचालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 06:00 IST

पंतप्रधानांनी स्वच्छतेचा मूलमंत्र देत संपूर्ण देशवासीयांना गोदरीमुक्तीसाठी आवाहन केले. दरम्यान स्वच्छ भारत मिशन ग्रामीण आणि शहरी अंतर्गत वैयक्तिक शौचालयाची योजना व्यापक स्वरूपात राबविण्यात आली. काही लोकांनी अनुदानाचा पहिला हप्ता घेतला. मात्र शौचालय बांधले नाही. काहींनी शौचालय बांधले. मात्र त्याचा वापर अजूनही सुरू केला नाही. गावात ९० टक्के शौचालय झाल्याच्या सर्वेक्षणावरून अनेक गावांना गोदरीमुक्त घोषित करून पुरस्कार प्रदान करण्यात आले.

ठळक मुद्देप्रशासनाची धावपळ वाढली : ‘घर तिथे शौचालय’ मोहीम सुरू

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सन २०१२ पासून २०१९ या कालावधीत शासनाच्या विविध योजनेतून वैयक्तिक शौचालयाची जम्बो मोहीम राबविण्यात आली. मात्र अद्यापही गडचिरोली जिल्ह्यासह राज्यात अनेक कुटुंब शौचालयाविना आहेत. आता २०२१ च्या जनगणनेत एकही कुटुंब शौचालयाविना दिसणार नाही, यासाठी शासन-प्रशासनाच्या वतीने खबरदारी घेतली जात आहे. त्यासाठी प्रत्येक घरी शौचालय उभे करण्यासाठी मोहीम सुरू करण्यात आली.पंतप्रधानांनी स्वच्छतेचा मूलमंत्र देत संपूर्ण देशवासीयांना गोदरीमुक्तीसाठी आवाहन केले. दरम्यान स्वच्छ भारत मिशन ग्रामीण आणि शहरी अंतर्गत वैयक्तिक शौचालयाची योजना व्यापक स्वरूपात राबविण्यात आली. काही लोकांनी अनुदानाचा पहिला हप्ता घेतला. मात्र शौचालय बांधले नाही. काहींनी शौचालय बांधले. मात्र त्याचा वापर अजूनही सुरू केला नाही. गावात ९० टक्के शौचालय झाल्याच्या सर्वेक्षणावरून अनेक गावांना गोदरीमुक्त घोषित करून पुरस्कार प्रदान करण्यात आले. अनुदानापोटी केंद्र व राज्य सरकारच्या कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला. मात्र महाराष्ट्रासह देशाच्या काही भागात शौचालय नसणारी ५ ते १० टक्के कुटुंब असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यादृष्टीने गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात पं.स.स्तरावरील संवर्ग विकास अधिकारी व ग्रा.पं.स्तरावरील ग्रामसेवक यांच्याकडून शौचालयाबाबतचा वस्तूनिष्ठ अहवाल डिसेंबर महिन्यात घेण्यात आला. या अहवालावरून गडचिरोली जिल्ह्यातील १० हजार कुटुंबांकडे शौचालय नसल्याची माहिती उजेडात आली आहे. शौचालय नसल्याबाबतची अंतिम माहिती पाठविण्याची मुदत १५ जानेवारी २०१९ पर्यंत जि.प.प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे शौचालय नसणाऱ्या जिल्ह्यातील कुटुंबांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. शौचालयाविना जे कुटुंब आहेत, त्यांना सरकारी अनुदानातून शौचालय बांधता यावे, यासाठी घर तिथे शौचालय ही मोहीम सुरू करण्यात आली असून या मोहिमेअंतर्गत १५ फेब्रुवारीपर्यंत वैयक्तिक शौचालयाचे बांधकाम पूर्ण करावयाचे आहेत, असे निर्देश आहेत.जनगणनेत होणार नोंद२०२१ मध्ये होणाºया जनगणनेत विविध प्रकारचे जवळपास २३ प्रश्न विचारण्यात आले आहेत. यामध्ये कुटुंबाकडे शौचालय आहे किंवा नाही, याचा स्पष्ट रकाना नमूद आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्हा, महाराष्ट्र राज्य अर्थातच भारतात किती कुटुंबाकडे शौचालय आहे, किती कुटुंबाकडे शौचालय नाही, याचा तंतोतंत आकडा शासनाला मिळणार आहे. परिणामी जगाला सुद्धा शौचालयाबाबतची भारताची स्थिती कळणार आहे.- तर दाखलेच मिळणार नाहीमार्च २०२० पर्यंत ज्या कुटुंबांकडे शौचालय दिसणार नाही, अशा कुटुंबांना ग्रामपंचायतीकडून लागणारे कोणतेही दाखले द्यावयाचे नाहीत, अशी भूमिका जि.प.प्रशासनाकडून घेण्यात आली आहे. याबाबत बिडीओ व ग्रामसेवकांच्या बैठकीत मंथन करण्यात आल्याची माहिती आहे. शौचालय बांधकामात हयगय करणाºया बिडीओ व ग्रामसेवकांवर कारवाई करण्याचा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड यांनी दिला आहे.लाभार्थ्यांना अंतिम संधीसन २०१२ पासून वैयक्तिक शौचालयाची योजना राबविण्यात आली. त्यापूर्वीही त्या-त्या सरकारच्या काळात शौचालय बांधकाम, दुरूस्तीसाठी योजना राबविण्यात आली. मात्र त्यानंतरही काही कुटुंब शौचालयाच्या योजनेपासून दूर राहिले. अशा लाभार्थ्यांना शासकीय अनुदानातून शौचालय बांधण्याची शेवटची संधी आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत वैयक्तिक शौचालय बांधून पूर्ण करावयाचे आहेत, तसे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड यांनी पं.स.बीडीओ व ग्रामसेवकांना दिले आहे.सात वर्षात बांधले १ लाख १३ हजार शौचालय२०१२ मध्ये शौचालयाबाबत कुटुंबाचे पायाभूत सर्वेक्षण करण्यात आले. २०१२ पासून २०१९ पर्यंत शासकीय योजनेतून गडचिरोली जिल्ह्यात एकूण १ लाख १३ हजार वैयक्तिक शौचालय बांधण्यात आले. त्यानंतर २०१९ मध्ये दोन महिन्यापूर्वी सर्वेक्षण करण्यात आलेल्या २६ हजार वाढीव कुटुंबांना शौचालय मंजूर करण्यात आले. सदर शौचालय ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्यात आले.

टॅग्स :government schemeसरकारी योजना