शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

'ती'चा कौल 'लाडकी बहीण'ला की 'महालक्ष्मी'ला ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 14:58 IST

दोन्हीकडूनही दावे, प्रतिदावे : गडचिरोलीची सरशी, आरमोरी द्वितीय तर अहेरी तृतीयस्थानी

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यात विक्रमी मतदानामध्ये महिलांचा मोलाचा वाटा आहे. गतवेळच्या तुलनेत महिलांचे सुमारे पाच टक्के मतदान अधिक झाले आहे. महिला मतदानात गडचिरोली मतदारसंघाने सरशी मिळवली असून आरमोरी द्वितीय तर अहेरी तृतीयस्थानी आहे. तथापि, वाढलेले मतदान लाडकी बहीणचे की महालक्ष्मीचे याचे उत्तर २३ नोव्हेंबरला मिळणार आहे.

राज्यातील सत्तारुढ महायुती सरकारकडून सध्या महिलांना लाडकी बहीण या महत्त्वाकांक्षी योजनेंतर्गत दीड हजार प्रतिमाह देण्यात येतात, त्यात २१०० रुपयांपर्यंत वाढीची घोषणाही केलेली आहे. महाविकास आघाडीने याच धर्तीवर जाहीरनाम्यात महालक्ष्मी योजना जाहीर करुन तीन हजार रुपये प्रतिमाह देण्याचे वचन दिले आहे. महायुतीने महिलांचा वाढलेला टक्का लाडकी बहीणचा असल्याचा दावा केला आहे तर महालक्ष्मी योजनेमुळे महिलांचे वाढलेले मतदान आपल्या पारड्यात पडेल, असा महाविकास आघाडीला विश्वास आहे. 

तूर्त दोन्हीकडूनही दावे, प्रतिदावे सुरू आहेत. महिलांना योजनेचा लाभ मिळाल्याने कौल महायुतीलाच मिळाल्याचा दावा भाजपचे पदाधिकारी करत आहेत. तर दुप्पट लाभाच्या घोषणेने महिला महायुतीकडे वळाल्याचा विश्वास व्यक्त होत आहे. 

... तरीही पुरुषांचा टक्का अधिकच महिला मतदारांचा गतवेळच्या तुलनेत मतदानाचा टक्का वाढला असला तरी नेहमीप्रमाणे पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या मतदानाचा टक्का कमीच आहे. आरमोरीमध्ये पुरुषांच्या मतदानाचा टक्का ७८.३८, गडचिरोलीत ७५.४८ तर अहेरीत ७५.५१ टक्के इतका आहे. जिल्ह्यात पुरुषांच्या मतदानाचा टक्का ७६.४१ इतका असून महिलांचा टक्का ७४.१० आहे.

महिलांचे मतदान कोठे किती टक्के वाढले? मतदारसंघ                २०१९            २०२४              वाढ आरमोरी                   ७१.०७             ७५.५८             ४.५१ गडचिरोली                ६८.०६             ७४.३५              ६.२९ अहेरी                       ६८.०८             ७२.२४             ४.१६ एकूण                       ६९.०५             ७४.१०              ५,०५

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४gadchiroli-acगडचिरोलीGadchiroliगडचिरोली