शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण गडचिरोलीतही वाघाची दहशत, चिंतलपेठात महिला ठार; कापूस वेचणी करताना हल्ला, पाच दिवसांतील दुसरी घटना

By संजय तिपाले | Updated: January 7, 2024 14:36 IST

जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र सुरुच असून पाच दिवसांतील हा दुसरा बळी आहे.

गडचिरोली: उत्तर गडचिरोलीत व्याघ्रहल्ले वाढलेले असताना आता दक्षिण गडचिरोलीतही धोका वाढला आहे. ७ जानेवारीला शेतात कापूस वेचणी करताना महिलेवर वाघाने हल्ला करुन ठार केले. ही घटना अहेरी तालुक्यातील चिंतलपेठ शिवारात घडली. जिल्ह्यात वाघांच्या हल्ल्यांचे सत्र सुरुच असून पाच दिवसांतील हा दुसरा बळी आहे.

सुषमा देविदास मंडल (५५,रा. चिंतलपेठ ता. अहेरी) असे मयत महिलेचे नाव आहे. त्या चिंतलपेठ शिवारातील जंगलालगतच्या शेतात कापूस वेचणीचे काम  करत होत्या. इतर महिलाही सोबत होत्या. सकाळ साडेअकरा वाजेच्या सुमारास दाट झुडूपात दडून बसलेल्या वाघाने सुषमा मंडल यांच्यावर पाठीमागून हल्ला केला. यात सुषमा मंडल या जागीच मृत्युमुखी पडल्या. त्यांच्या किंचाळण्याच्या आवाजाने इतर महिलांनी धाव घेतली तेव्हा वाघ दिसून आला. 

महिलांनी आरडाओरड केल्यानंतर वाघ जंगलात निघून गेला. दरम्यान, गडचिरोली शहरापासून ७ किलोमीटरवरील वाकडी जंगलात ३ जानेवारीला सरपण गोळा करण्यासाठी गेलेल्या मंगलाबाई विठ्ठल बोळे (५५, रा.वाकडी ) यांच्यावर वाघाने हल्ला केला होता, यात त्यांचा मृत्यू झाला होता. उत्तर गडचिरोलीत वाघांची दहशत तर आहेच, पण दक्षिण गडचिरोलीतही वाघाने महिलेचा बळी घेतल्याने खळबळ उडाली आहे. 

नातेवाईकांनी व्यक्त केला रोष सुषमा मंडल यांच्या नातेवाईकांनी वनविभागाविरुध्द तीव्र रोष व्यक्त केला. वाघाचे वास्तव्य असल्याची सूचना वनविभागाने परिसरातील नागरिकांना द्यायला हवी होती, त्यामुळे लोक सतर्क राहिले असते, पण वनविभाग गाफील राहिला. त्यामुळे सुषमा मंडल यांना जीव गमवावा लागल्याची संतप्त भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली. वनविभाग व पोलिस उशिरापर्यंत घटनास्थळी पोहोचले नव्हते, त्यामुळे नातेवाईकांसह गावकऱ्यांच्या भावनाही तीव्र होत्या. 

टॅग्स :TigerवाघGadchiroliगडचिरोलीDeathमृत्यू