तिगलगुडम, मर्रीगुडम गावकऱ्यांना मिळणार याेजनाचा लाभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:45 IST2021-07-07T04:45:57+5:302021-07-07T04:45:57+5:30

या दोन गावांची लोकसंख्या जवळपास १८० आहे. या गावातील आदिवासी लोक अशिक्षित व मागसलेले असून त्यांचे जीवनमान पूर्णत: वनोपज ...

Tigalgudam, Marrigudam villagers will get the benefit of the scheme | तिगलगुडम, मर्रीगुडम गावकऱ्यांना मिळणार याेजनाचा लाभ

तिगलगुडम, मर्रीगुडम गावकऱ्यांना मिळणार याेजनाचा लाभ

या दोन गावांची लोकसंख्या जवळपास १८० आहे. या गावातील आदिवासी लोक अशिक्षित व मागसलेले असून त्यांचे जीवनमान पूर्णत: वनोपज व जंगलावर निर्भर आहे. अशिक्षित व मागसलेपणामुळे शासनाच्या विविध योजनेपासून नागरिक वंचित असल्याचे तालुका प्रशासनाचे निदर्शनास आले. तहसीलदार एच. एस. सय्यद व नायब तहसीलदार प्रकाश पुप्पालवार हे प्रत्यक्ष सदर गावात भेट देऊन नागरिकांशी संवाद साधले. तेथील बरेच लोकांकडे आधार कार्ड नसल्यामुळे रेशन कार्ड, संजय गांधी निराधार योजना, बँक पासबुक इत्यादीपासून वंचित असल्याचे लक्षात आले. रेशन कार्ड नसलेले, संजय गांधी योजनेत पात्र असून, लाभ न भेटलेल्या नागरिकांची माहिती घेऊन तेथील नागरिकांना सिरोंचा मुख्यालयी आणण्याची व्यवस्था करुन सर्व नागरिकांचे आधार कॅम्प घेऊन प्रशासनाकडून आधार कार्ड काढण्यात आले. सहा कुटुंबांना रेशनकार्ड तयार करून देण्यात आले. सर्व नागरिकांना आधार कार्ड प्राप्त होताच रेशन कार्ड तयार करून शासन योजनेतून अन्न धान्य पुरवठा, संजय गांधी निराधार योजनाअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अनुदान मंजूर करण्याची कार्यवाही करण्यात येईल, असे तालुका प्रशासनातर्फे कळविले आहे.

Web Title: Tigalgudam, Marrigudam villagers will get the benefit of the scheme