लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : थ्रो बॉल असोसिएशनच्या वतीने परभणी येथे होत असलेल्या राज्यस्तरीय थ्रो बॉल अजिंक्यपद स्पर्धेकरिता २ सप्टेंबर रोजी चाचणी आयोजित करून गडचिरोली जिल्ह्याचा मुलामुलींच्या संघाची निवड करण्यात आली.थ्रो बॉल जिल्हा संघामध्ये १४ मुले व १० मुलींचा समावेश आहे. निवड चाचणीचे उद्घाटन गोंडवाना सैनिकी विद्यालयाचे प्राचार्य संजीव गोसावी व उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे यांच्या हस्ते झाली. याप्रसंगी निवड समिती सदस्य म्हणून गडचिरोली जिल्हा थ्रो बॉल असोसिएशनचे सचिव ऋषीकांत पापडकर, उपाध्यक्ष महेश गेडाम, मार्गदर्शक शंकर दासरवार, विनय देशमुख आदी उपस्थित होते.थ्रो बॉल मुलांच्या जिल्हा संघात प्रथम भांडेकर, वैभव टेकाम, सौरभ म्हस्के, संकेत मलोडे, चैतन्य नरोटे, ज्ञानेश वेलादी, यश मडावी, उदय आकुलवार, हेमंत घोसरे, प्रणित चुधरी, अमोल मडावी, विवेक बन्सोड, आर्या पातोडे, कपील नवाते आदींचा समावेश आहे.मुलींच्या संघामध्ये वैष्णवी टोटकीया, प्रेरणा लेनगुरे, सेजल खेवले, धनश्री वाघाडे, निशल मधुमटके, मेहेरोश शेख, आम्रपाली साखरे, काजल जांभुळकर, सुरभी भोयर व शिवांगी गुप्ता आदींचा समावेश आहे. परभणी येथे होणाऱ्या राष्ट्रीय राज्यस्तरीय थ्रो बॉल स्पर्धेसाठी सदर संघाने जोरदार सराव सुरू केला असून हा संघ रवाना होणार आहे.
थ्रो बॉल जिल्हा संघाची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2018 22:37 IST
थ्रो बॉल असोसिएशनच्या वतीने परभणी येथे होत असलेल्या राज्यस्तरीय थ्रो बॉल अजिंक्यपद स्पर्धेकरिता २ सप्टेंबर रोजी चाचणी आयोजित करून गडचिरोली जिल्ह्याचा मुलामुलींच्या संघाची निवड करण्यात आली.
थ्रो बॉल जिल्हा संघाची निवड
ठळक मुद्देराज्यस्तरीय स्पर्धेत करणार प्रतिनिधित्व : १४ मुले व १० मुलींचा संघात समावेश