शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
2
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
3
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
4
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
5
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
6
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
7
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
8
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
10
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
11
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
12
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
13
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
14
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
15
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
16
सुट्टीसाठी तळमळणाऱ्या मंत्र्यांना ‘डिसेंबर’ हुडहुडी!
17
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
18
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
19
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
20
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ट्रॅक्टर-जीपची जाेरदार धडक, तीन प्रवासी ठार, 13 जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 05:00 IST

भरधाव ट्रॅक्टर आणि प्रवासी घेऊन जाणाऱ्या जीपमध्ये समोरासमोर टक्कर होऊन जीप चालकासह आणखी दोन जण ठार झाले. याशिवाय इतर १३ जण जखमी झाले. त्यापैकी ४ जणांना पुढील उपचारांसाठी चंद्रपूरला पाठविण्यात आले. हा अपघात सोमवारी रात्री घडला. सूरज चांदेकर रा. मन्नेराजाराम, मारोती जलम्मा सिडाम (४५ वर्षे) रा. गिऱ्हा आणि बालाजी इरपा कुडमेथे (२१ वर्षे) रा. मिरकल अशी मृतांची नावे आहेत. 

ठळक मुद्देमेडपल्ली-तलवाडा मार्गावरील अपघात; चाैघांवर चंद्रपुरात उपचार सुरू

लाेकमत न्यूज नेटवर्कअहेरी/पेरमिली : मेडपल्ली ते तलवाडा मार्गावर भरधाव ट्रॅक्टर आणि प्रवासी घेऊन जाणाऱ्या जीपमध्ये समोरासमोर टक्कर होऊन जीप चालकासह आणखी दोन जण ठार झाले. याशिवाय इतर १३ जण जखमी झाले. त्यापैकी ४ जणांना पुढील उपचारांसाठी चंद्रपूरला पाठविण्यात आले. हा अपघात सोमवारी रात्री घडला. सूरज चांदेकर रा. मन्नेराजाराम, मारोती जलम्मा सिडाम (४५ वर्षे) रा. गिऱ्हा आणि बालाजी इरपा कुडमेथे (२१ वर्षे) रा. मिरकल अशी मृतांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, ट्रॅक्टर (एमएच ३३, एफ ३३८८) हा मिरकल येथील विनोद तलांडी यांच्या बकऱ्या आणण्यासाठी नैनेर येथे गेला होता. तिकडून पेरमिली-मेडपल्ली मार्गे परत येत असताना आलापल्लीकडून मेडपल्लीकडे प्रवासी घेऊन येणाऱ्या मॅक्स जीपगाडी (एमएच ३१, सीआर ०८१५) सोबत ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला. मृतकांचे मंगळवारी अहेरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. अधिक तपास पेरमिली उपपोलीस ठाण्याचे प्रभारी पंकज सपकाळे यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक धवल देशमुख करीत आहे. 

या अपघातातील जखमींपैकी बाराजी करपा कुडमेथे (२१) रा. मिरकल, कमला अर्जुन सिडाम (५०) रा. मन्नेराजाराम, शशिकला श्यामराव मडावी (२९) रा. मन्नेराजाराम आणि रोहित श्यामराव मडावी (३५) या चार जणांना अहेरी उपजिल्हा रुग्णालयातून चंद्रपूरला हलविण्यात आले. इतर जखमींमध्ये सुनीता विनायक मडावी (५८) रा. मन्नेराजाराम, सुमनबाई लाचा मडावी (६०), नीता श्यामराव मडावी (१८) रा.घरनूर, राधा गन्नू इस्टाम (४५) रा.मन्नेराजाराम, पापक्का बांडे सेडमेक (४५), लक्ष्मीबाई तलांडे (५०), कविता गंगाराम मडावी (२६), वैशाली चिंता मडावी (४०) आणि जपना श्यामराव मडावी (७) यांचा समावेश आहे.

 

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू