शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

दोन अपघातात तीन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2019 11:10 PM

ट्रॅक्टर उलटून महिला शेतकरी ठार झाली तर तीचा मुलगा व पती गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी जोगीसाखरा येथे घडली. तसेच सिरोंचा तालुक्यातील निमलगुडम गावच्या फाट्याजवळ ट्रकची दुचाकीला धडक बसली. यामध्ये दोघे ठार झाले.

ठळक मुद्देजोगीसाखरा व निमलगुडम येथील घटना । शेतावर जाताना ट्रॅक्टर उलटला

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी/गुड्डीगुडम : ट्रॅक्टर उलटून महिला शेतकरी ठार झाली तर तीचा मुलगा व पती गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी सकाळी जोगीसाखरा येथे घडली. तसेच सिरोंचा तालुक्यातील निमलगुडम गावच्या फाट्याजवळ ट्रकची दुचाकीला धडक बसली. यामध्ये दोघे ठार झाले.पुष्पा बाजीराव उईके (३२) रा. जोगीसाखरा असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा पती बाजीराव उईके (३५), मुलगा प्रणय उईके(१७) व ट्रक्टरवर बसलेली शिल्पा धर्मा कुमरे (१७) हे तीघे जखमी झाले आहेत. जोगीसाखरा येथील बाजीराव उईके हे पत्नी, मुलगा व अन्य एका मुलीला घेऊन ट्रॅक्टरने शेतीची कामे करण्यासाठी शेतात पांदन रस्त्याने जात होते. दरम्यान अचानक गुरांचा कळप ट्रॅक्टरच्या समोर आला. या कळपाला वाचविण्यासाठी वाहन चालक बाजीराव उईके यांनी ट्रॅक्टर बाजुला घेतली. मात्र ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. यात पुष्पा उईके ही जागीच ठार झाली. जखमींना विलास पेंदाम यांनी स्वत:च्या वाहनाने आरमोरी रूग्णालयात दाखल केले. अपघातात एकाच कुटुंबावर संकट कोसळल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी भेट घेतली.ट्रकची दुचाकीला धडकसीजी ०८ एसी ९२९७ क्रमांकाचा ट्रक तेलंगणातून लोखंड भरून गोंदियाकडे जात होता. तर छत्तीसगड राज्यातील संड्रा येथील रहिवासी असलेले नागरिक अहेरीवरून छत्तीसगडकडे सिरोंचा मार्गे जात होते. दरम्यान निमलगुडम फाट्याजवळ ट्रक व दुचाकी यांची समोरासमोर धडक बसली. सदर अपघात शनिवारी रात्री ७.३० वाजता घडला. या धडकेत दुचाकीवरील दोघेही ठार झाले. हे दोघेही छत्तीसगड राज्यातील संड्रा गावातील रहिवासी असल्याची माहिती प्राप्त झाली. मात्र त्यांची नावे कळू शकली नाही. दोघांनाही पोलिसांनी रूग्णालयात भरती केले. मात्र रूग्णालयाने त्यांना मृत घोषित केले.

टॅग्स :Accidentअपघात