शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

यंदा धान खरेदीची संपूर्ण प्रक्रिया होणार ऑनलाइन

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2024 14:43 IST

५३ केंद्र मंजूर : शेतकऱ्यांची नोंदणी सुरू

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाअंतर्गत आविका संस्थाच्या वतीने केल्या जात असलेल्या धान खरेदीच्या व्यवहारात पारदर्शकता आणून गैरव्यवहाराला पूर्णतः पायबंद घालण्यासाठी यावर्षीच्या खरीप हंगामापासून धान खरेदीची संपूर्ण प्रक्रिया १०० टक्के ऑनलाइन करण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला असून याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. 

आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत कुरखेडा, कोरची, देसाईगंज, आरमोरी, धानोरा, चामोर्शी तालुक्यात खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामात धानाची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र धान खरेदी, भरडाईच्या व्यवहारात गैरव्यवहार होत असल्याचे अनेकदा उघडकीस आले. त्यामुळे यावर्षीच्या खरीप हंगामापासून धान खरेदीची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन पार पाडण्यात येत आहे. 

यंदाच्या खरीप हंगामासाठी गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत जवळपास ५३ केंद्र मंजूर करण्यात आली आहेत. धान विक्रीसाठी शेतकऱ्यांना नोंदणीकरिता ऑनलाइन पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले आहे. १० ऑक्टोबरपासून नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली असून १५ नोव्हेंबरपर्यंत अखेरची मुदत आहे. 

यावर्षीपासून खरेदी, बारदाना तसेच भरडाईची सर्व प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन होणार आहे. त्यामुळे आदिवासी विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना ऑनलाइन पद्धतीने गडचिरोली जिल्ह्यासह सर्व जिल्ह्यातील धान खरेदी व इतर कामांची माहिती पाहता येणार आहे. 

आदिवासी विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक लीना बन्सोड यांनी धान खरेदीची सर्व प्रक्रिया ऑनलाइन व गतिमान करावी, शेतकऱ्यांना त्रास होणार नाही, अशा सूचना अधिनस्त अधिकाऱ्यांना काही दिवसांपूर्वीच झालेल्या बैठकीत दिल्या असल्याची माहिती आहे. 

४८ तासात होतील चुकारे 

  • आविका संस्थाच्या आधारभूत केंद्रावर धानाची खरेदी केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यासाठी १५ दिवस ते एक महिन्याचा कालावधी लागत होता. काही शेतकऱ्यांना तर महिना दीड महिना चुकारे मिळत नव्हते. परिणामी धानाची विक्री केलेले अनेक शेतकरी बँकेच्या चकरा मारून त्रस्त होत होते. 
  • यंदा सुरुवातीपासून तर शेवटपर्यतची संपूर्ण प्रकिया ऑनलाइन होत असल्याने संबंधित शेतकऱ्यांना ४८ तासामध्ये धानाचे चुकारे मिळतील, असा दावा महामंडळाने केला आहे. यंदापासून थेट व्यवस्थापकीय कार्यालयातून चुकारे वळते करण्यात येणार आहे
टॅग्स :GadchiroliगडचिरोलीPaddyभातAgriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेती