शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Devendra Fadanvis: वेश्यांसाठीच्या पैशावर डल्ला मारणारं हे सरकार, फडणवीसांचा गडचिरोलीतून प्रहार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 15:50 IST

गडचिरोलीत सर्वाधिकवेळा भेट देणारा मुख्यमंत्री मीच असल्याचे सांगत फडणवीसांनी आक्रोश मोर्चाला जनतेचा मोठा प्रतिसाद दिसत असल्याचे म्हटले

गडचिरोली - मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार प्रहार केला. त्यानंतर, आता विरोधी पक्षनेते आणि देवेंद्र फडणवीस यांनी थेट गडचिरोलीतूनमहाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाविकास आघाडी सरकार हे भ्रष्टाचारी घोटाळेबाज आणि अत्याचारी असल्याचे सांगत भाजपच्यावतीने गडचिरोलीत आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार हे संजय राऊत जो शब्द वापरतात ते आहे, असे म्हणत जोरदार प्रहार केला. 

गडचिरोलीत सर्वाधिकवेळा भेट देणारा मुख्यमंत्री मीच असल्याचे सांगत फडणवीसांनी आक्रोश मोर्चाला जनतेचा मोठा प्रतिसाद दिसत असल्याचे म्हटले. महाविकास आघाडी सरकारने कोरोना काळात ना शेतकऱ्यांना मदत केली, ना कामगारांना मदत दिली. ना बारा बलुतेदारांना मदत केली. सर्वसामान्य नागरिकांना एक रुपयाचीदेखील मदत महाविकास आघाडी सरकारने केली नाही. या सरकारने कोविड कालावधीत केवळ दारु दुकानदारांना, बार मालकांना आणि राज्यातील बिल्डर्संना मदत केली. दारु परवान्याची किंमत 50 टक्क्यांनी कमी केली. तर, बिल्डर्स गरीब झाले असून त्यांनाही सवलत दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले. 

जिथे जाऊ तिथे खाऊ, आपण सगळे भाऊ भाऊ असं काम महाविकास आघाडी सरकारचं आहे. या सरकारने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना 5 रुपयांची मदत देण्याची घोषणा केली, एवढं एकच चांगलं काम सरकारने केलं. मात्र, यातही पैसा खायचं काम यांनी केलं. सरकारच्या निकटवर्तीयांना, जवळच्या संस्थांना हा निधी दिला. मी स्वत: नांदेडमधील घटनेचा उल्लेख विधानसभेच्या अधिवेशनात केला होता. सरकारने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना मिळणारा निधी हडप केला. म्हणजे या सरकारला काय म्हणावं, मी तो शब्द उच्चारणार नाही. संजय राऊत हा शब्द सातत्याने घेत असतात, तसं हे सरकार असल्याचं फडणवीस यांनी म्हटले.  

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसGadchiroliगडचिरोलीBJPभाजपाMahavikas Aghadiमहाविकास आघाडी