चोरट्यांनी केला तीन लाखांचा ऐवज लंपास

By Admin | Updated: October 23, 2016 01:32 IST2016-10-23T01:32:31+5:302016-10-23T01:32:31+5:30

शहरातील रामनगर वॉर्ड क्रमांक २० मधील रहिवासी मधुकरराव भोयर यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी २० हजार रुपयांच्या रकमेसह

Thieves have looted three lakhs of rupees | चोरट्यांनी केला तीन लाखांचा ऐवज लंपास

चोरट्यांनी केला तीन लाखांचा ऐवज लंपास

रामनगर वॉर्डातील घटना : चिवडापार्टीही केली
गडचिरोली : शहरातील रामनगर वॉर्ड क्रमांक २० मधील रहिवासी मधुकरराव भोयर यांच्या घरी अज्ञात चोरट्यांनी २० हजार रुपयांच्या रकमेसह ३ लाख २५ हजार रुपये किंमतीचे १० तोळे सोने चोरी केल्याची घटना १९ आॅक्टोबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली.
मधुकर भोयर हे कुटुंबासह कामानिमित्त १९ आॅक्टोबर रोजी नागपुरला गेले होते. घरी कोणीही नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी भोयर यांच्या घराचा मुख्य दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर कपाट व त्यातील लॉकर तोडून १० तोळे सोने व २० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ३ लाख ४५ हजारांच्या मुद्देमालाची चोरी केली. अज्ञात चोरट्यांनी मधुकर भोयर यांच्या घरात चिवडापार्टीसुद्धा केली. त्यानंतर ते सोने व रोख रक्कम घेऊन पसार झाले. दुसऱ्या दिवशी भोयर यांच्या घरी चोरी झाल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबतची माहिती भोयर यांना दिली. मधुकर भोयर गडचिरोलीला आल्यानंतर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध तक्रार दाखल केली. अज्ञात चोरट्यांविरोधात गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Thieves have looted three lakhs of rupees