जि.प.मध्ये मोठी उलथापालथ होणार

By Admin | Updated: September 9, 2014 00:21 IST2014-09-09T00:21:51+5:302014-09-09T00:21:51+5:30

२१ सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत सत्ता प्राप्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने पुन्हा कंबर कसली असून पक्षाचे

There will be huge upheaval in ZP | जि.प.मध्ये मोठी उलथापालथ होणार

जि.प.मध्ये मोठी उलथापालथ होणार

गडचिरोली : २१ सप्टेंबर रोजी गडचिरोली जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत सत्ता प्राप्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने पुन्हा कंबर कसली असून पक्षाचे प्रदेश संघटक डॉ. उपेंद्र कोठेकर यांच्या आदेशानंतर भारतीय जनता पक्षाचे नेते कामाला लागले आहेत. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असलेला सत्तेचा मधुचंद्र संपुष्टात येण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.
गडचिरोली जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पद सर्वसाधारण प्रवर्ग (ओबीसी)साठी राखीव आहे. ५१ सदस्यीय गडचिरोली जिल्हा परिषदेत काँग्रेसचे १३ सदस्य आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे १०, भाजपचे ८, युवाशक्ती आघाडीचे ७, शिवसेनेचे २, नाग विदर्भ आंदोलन समितीचे ४, अपक्ष आमदार दीपक आत्राम यांच्या गटाचे ३ सदस्य आहेत. ३ अपक्ष सदस्य आहेत. १ भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा सदस्य आहे. यावेळी जिल्हा परिषदेत ओबीसी प्रवर्गाचे ७ सदस्य अध्यक्ष पदासाठी दावेदार आहेत. मात्र भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष पदासाठीचे संख्याबळ जुळत आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. भाजप, शिवसेना व नाग विदर्भ आंदोलन समितीसह युवाशक्ती आघाडीतून फुटलेले दोन व एक अपक्ष सदस्य अशी १७ सदस्यांची संख्या भाजपने आपल्या गोट्यात आणली, असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचा एक फुटीर गट व आविसंचे सदस्यही या गटाला समर्थन देण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादीला पुन्हा सत्तेबाहेर जाण्याची वेळ येईल, असे राजकीय जाणकार मानतात. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: There will be huge upheaval in ZP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.