शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
3
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
4
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
5
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
6
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
7
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
8
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
9
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
10
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
11
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
12
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
13
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
15
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
16
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
17
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
18
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
19
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
20
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू

पाणी पुरवठ्याची २६४ कामे होणार

By admin | Updated: February 4, 2015 23:13 IST

जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत २०१५-१६ व २०१६-१७ या दोन वर्षाचा कृती आराखडा तयार केला असून या आराखड्यात नळ योजना

दोन वर्षाचा कृती आराखडा तयारदिलीप दहेलकर - गडचिरोलीजिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेंतर्गत २०१५-१६ व २०१६-१७ या दोन वर्षाचा कृती आराखडा तयार केला असून या आराखड्यात नळ योजना व पिण्याच्या पाण्याच्या विहिरीची जिल्हाभरात २६४ कामे घेण्यात आली आहे. या कामाचा प्रस्ताव आराखड्यासह राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. मंजुरी मिळताच तांत्रिक व प्रशासकीय मान्यतेनंतर पाणीपुरवठ्याची सदर कामे होणार आहेत.राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना, प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना व पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची कामे जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागामार्फत केली जातात. ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्यावतीने दोन वर्षाचा पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा कृती आराखडा तयार केला जातो. यानुसार गडचिरोली जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने बाराही तालुक्यात पाणीपुरवठ्याच्या सोयी करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. यामध्ये जुने व नवीन मिळून एकूण २६४ कामे घेण्यात आली आहे. कृती आराखड्यानुसार अहेरी तालुक्यात ३२ कामे घेण्यात आली असून यामध्ये २१ नळ पाणीपुरवठा योजना, आलापल्ली व नागेपल्ली येथे प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना व पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचे नऊ कामे घेण्यात आली आहेत. आरमोरी तालुक्यात २० कामाचे नियोजन करण्यात आले असून यात १६ स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना व चार पिण्याच्या पाण्याच्या विहिरीचा समावेश आहे. भामरागड तालुक्यात १२ कामांचे नियोजन करण्यात आले असून यामध्ये दोन नळ पाणीपुरवठा योजना व १० विहिरींचा समावेश आहे. चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक ५७ कामांचे नियोजन करण्यात आले असून यात २२ स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना व तीन विहिरी व ३२ प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजनेच्या कामांचा समावेश आहे. देसाईगंज तालुक्यात स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजनेची आठ कामे प्रस्तावित आहेत. धानोरा तालुक्यात ४१ कामे घेण्यात आले असून यामध्ये ३१ स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना व १० विहिरींच्या कामांचा समावेश आहे. एटापल्ली तालुक्यात सहा स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना व सहा विहिरींचा समावेश आहे. गडचिरोली तालुक्यात पाणीपुरवठ्याच्या ३० कामांचे नियोजन करण्यात आले असून यामध्ये २५ स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना व पाच विहिरींच्या कामांचा समावेश आहे. कोरची तालुक्यात पाच स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजना व आठ विहिरींचा समावेश आहे. कुरखेडा तालुक्यात २१ कामांचे नियोजन असून यामध्ये १४ नळ पाणीपुरवठा योजना व सात विहिरींचा समावेश आहे. मुलचेरा तालुक्यात नळ पाणीपुरवठा योजना पाच व चार विहिरी अशा एकूण नऊ कामांचे नियोजन आहे. सिरोंचा तालुक्यात स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजनेची नऊ कामांचे नियोजन आहे. तयार करण्यात आलेल्या दोन वर्षाच्या कृती आराखड्यात जुन्या व नव्या पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा समावेश आहे. मात्र या आराखड्यात नव्या कामांची संख्या अधिक आहे. दोन वर्षात होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या २६४ कामांची अंदाजपत्रकीय किंमत १२६१३.३७ लक्ष रूपये आहे. पिण्याच्या पाण्याच्या एका विहिरीचा खर्च जवळपास आठ लाख रूपये तर स्वतंत्र नळ पाणीपुरवठा योजनेसाठी ७० ते ८० लाख रूपयांचा खर्च येतो.