पात्र उमेदवार प्रतीक्षेतच : आचारसंहिता संपल्यानंतरच निर्णय होणारगडचिरोली : जिल्हा प्रशासनाच्यावतीने महसूल विभागातील ३३ तलाठी पदांसाठी भरती प्रक्रिया घेण्यात आली. या भरती प्रक्रियेची लेखी परीक्षा घेऊन गुणतालिका प्रसिध्द करण्यात आली. मात्र पेसा कायद्यान्वये पदभरती करण्याबाबतचा राज्यपालांच्या अधिसूचनेचा अध्यादेश निर्गमित झाला. यामुळे जिल्ह्यातील तलाठी पदाची भरती प्रक्रिया रखडली होती. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवून मार्गदर्शन मागविले होते. मात्र यावर अद्यापक कुठलाही निर्णय झालेला नाही.गडचिरोली जिल्ह्यात १२ ही तालुक्यात ४० राजस्व मंडळ कार्यालय आहे. या मंडळांतर्गत जिल्ह्यात एकूण २३३ तलाठी साझे आहेत. काही दिवसापूर्वी प्रशासनाने जिल्ह्यातील मंडळ अधिकाऱ्यांची पदोन्नती करून नायब तहसीलदार पदावर नियुक्ती केली. रिक्त झालेल्या मंडळ अधिकाऱ्यांच्या जागा तलाठ्यातून भरण्यात आल्या. जवळपास १८ तलाठ्यांची मंडळ अधिकारी म्हणून पदोन्नती करण्यात आली. यामुळे जिल्ह्यात २७ पदे रिक्त झाली. येत्या दोन महिन्यात तलाठ्यांची ६ पदे रिक्त होणार आहेत. यामुळे जिल्हा प्रशासनाने तलाठ्यांच्या ३३ पदासाठी जाहीरात प्रसिध्द करून अर्ज मागविले. अनेक उमेदवारांनी अर्ज करून लेखी परीक्षाही दिली. प्रशासनाच्यावतीने रिक्त झालेल्या जवळपास १८ मंडळ अधिकारी पदावर तलाठ्यांची पदोन्नती करण्यात आली. सहा उपविभागात तलाठ्यांची एकूण २७ पदे रिक्त झालीत. यात गडचिरोली तालुक्यात ३, देसाईगंज ३, कुरखेडा ४, अहेरी ६ व एटापल्ली तालुक्यात सर्वाधिक ११ पदांचा समावेश आहे. यामुळे कार्यरत असणाऱ्या तलाठ्यांना लगतच्या साझ्याचा अतिरिक्त प्रभार सोपविला आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
तलाठी पदभरतीवर निर्णय नाही
By admin | Updated: September 13, 2014 23:53 IST