शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

दोन दुचाकी समोरासमोर धडकल्या; तीन जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2022 05:00 IST

दोन्ही वाहनांवरील पाच लोक रस्त्याच्या कडेला पडले. या अपघातात पाचही लोकांच्या पायांचे हाड मोडले. या अपघातग्रस्तांपैकी पुरुषोत्तम अलोने (३०) रा. कोहळीटोला ता. देवरी, अशोक बकाराम नाईक (४५) रा. अंबोरा जि.गाेंदिया आणि कांतीलाल घुघवा (१८) रा. दोडके ता. काेरची या तिघांचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. तर तुळशीराम कवास, रा. रेंगेपार जि. गाेंदिया आणि प्यारेलाल घुघवा रा.दोडके हे गंभीर जखमी आहेत.

लाेकमत न्यूज नेटवर्ककोरची : कोरची मुख्यालयापासून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या पकनाभट्टी  येथे गुरुवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास देवरी (जि.गाेंदिया) कडून येत असलेली दुचाकी आणि समोरून येणारी दुसरी दुचाकी यांच्यात जबर धडक झाली. यात दोन्ही दुचाकी वाहने रस्त्याच्या कडेला फेकल्या जाऊन तिघांना प्राण गमवावे लागले. या अपघातात दाेघे जण गंभीर जखमी आहेत. प्राप्त माहितीनुसार, देवरी येथून बेळगावकडे  जात असलेल्या दुचाकीवरून (एमएच २५, झेड ४३६७) तिघे जण प्रवास करत होते. त्यांच्या दुचाकीची समोरून येत असलेल्या दुचाकीला (सीजी ०४, एलआर ३२९५) जबर धडक बसली. त्यामुळे दोन्ही वाहनांवरील पाच लोक रस्त्याच्या कडेला पडले. या अपघातात पाचही लोकांच्या पायांचे हाड मोडले. या अपघातग्रस्तांपैकी पुरुषोत्तम अलोने (३०) रा. कोहळीटोला ता. देवरी, अशोक बकाराम नाईक (४५) रा. अंबोरा जि.गाेंदिया आणि कांतीलाल घुघवा (१८) रा. दोडके ता. काेरची या तिघांचा उपचारासाठी नेत असताना मृत्यू झाला. तर तुळशीराम कवास, रा. रेंगेपार जि. गाेंदिया आणि प्यारेलाल घुघवा रा.दोडके हे गंभीर जखमी आहेत. सर्वांना जखमी अवस्थेत काेरची ग्रामीण रूग्णालयात आणून प्राथमिक उपचार केल्यानंतर गडचिरोली येथे रुग्णवाहिकेने हलविण्यात आले. पण पुढील उपचार मिळण्यापूर्वीच दाेघांचा मृत्यू झाला.सदर अपघाताची माहिती सामाजिक कार्यकर्ते आशिष अग्रवाल यांना मिळाल्यानंतर त्यांनी रुग्णवाहिका पाठविण्यासाठी १०८ क्रमांकावर संपर्क केला; परंतु रुग्णवाहिका गडचिरोली आणि चंद्रपूरला गेली असल्याचे सांगण्यात आल्याने त्यांनी स्वतःची गाडी घेऊन घटनास्थळ गाठले व जखमींना कोरचीच्या ग्रामीण रुग्णालयात नेण्यास मदत केली. दरम्यान, नगरसेवक गुड्डू अग्रवाल यांनीसुद्धा आपल्या वाहनाने रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. घटनास्थळी तहसीलदार छगनलाल भंडारी यांनी भेट देऊन घटनेची माहिती घेऊन रुग्णांच्या नातेवाइकांना अपघाताची माहिती दिली.

चारपैकी तीन डॉक्टर गैरहजरसदर रुग्णांना कोरचीच्या ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतरही रुग्णांना बराच वेळ बाहेर तडफडत राहावे लागले. या रुग्णालयात ४ वैद्यकीय अधिकारी कार्यरत आहेत. मात्र, त्यापैकी ३ वैद्यकीय अधिकारी नेहमीप्रमाणे गैरहजर दिसून आले. होळीचा सण असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढते. असे असताना सदर रुग्णालय एका डॉक्टरच्या भरवशावर सुरू असल्याने रुग्णांना योग्य उपचार मिळण्यास विलंब होत आहे. ५ गंभीर रुग्णांवर एकच डॉक्टर उपचार करीत असल्याचे चित्र गुरूवारी दिसत होते.

 

टॅग्स :Accidentअपघात