लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गुजरातच्या जामनगर येथील अंबानी समूहाच्या 'वनतारा' या संगोपन केंद्रात हलविलेल्या महादेवी (माधुरी ) हत्तिणीला परत आणण्यासाठी कोल्हापुरात हजारो लोक रस्त्यावर उतरले. जनभावना लक्षात घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार असल्याचे घोषित केले. तथापि, राज्यातील एकमेव हत्ती कॅम्प असलेल्या कमलापूर येथील विकासकामे रखडलेली आहेत, त्यामुळे पर्यटकांची संख्या मर्यादित आहे. दि. १२ ऑगस्टच्या जागतिक हत्ती दिनानिमित्त या कॅम्पला हत्तीएवढे बळ कधी मिळणार? असा प्रश्न वन्यजीवप्रेमींमधून उपस्थित होत आहे.
माओवाद्यांनी १९८० मध्ये जिल्ह्यात शिरकाव केला, तेव्हा जंगलव्याप्त कमलापूर (ता. अहेरी) येथे पहिली सभा घेतली होती, त्यानंतर ही हिंसक चळवळ जिल्हाभर पसरली. ही रक्तरंजित ओळख पुसून कमलापूर येथे वनविभागाने राज्यातील एकमेव कॅम्पची घोषणा केली, पण पायाभूत सुविधांचा अभाव, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आहे.
कर्मचारी जुन्या नियमानुसारचहत्ती कॅम्पमध्ये सध्या १७ कर्मचारी आहेत. यात नऊ कर्मचारी नियमित आहेत, तर आठ कर्मचारी रोजंदारी तत्त्वावरील आहेत.स्थायी कर्मचान्यांमध्ये ५ माहूत, तर ४ चाराकटर आहेत. सहा दशकांपूर्वी चार हत्तींसाठी जेवढे मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले होते. तेच मनुष्यबळ आतासुद्धा आहे. यात वाढ झालेली नाही.
आरोग्य सुविधा, बगिचा, विश्रामगृह हवेकमलापूरच्या हत्ती कॅम्पमधील हत्तींना दर्जेदार आरोग्यसुविधा मिळणे आवश्यक आहे. शासनाने येथे उपचारासाठी आधुनिक दर्जाची यंत्रसामग्री, तसेच इतर सोयी-सुविधा पुरविणे गरजेचे आहे. पर्यटनस्थळ म्हणून विकास करण्यासाठी कॅम्प परिसरात गार्डन, विश्श्रामगृह निर्माण करावे, अशी भावना पर्यटकांची आहे.
कॅम्पमध्ये नऊ हत्ती, 'बसंती' सर्वांत वयस्क
- कमलापूर येथील हत्ती कॅम्पमध्ये सध्या नऊ हत्ती आहेत. यात सात हत्ती मोठे, तर २ लहान आहेत. त्यातही २ नर व सात मादी हत्तींचा समावेश आहे.
- यात प्रामुख्याने बसंती, रूपा, अजित, मंगला, राणी, प्रियंका, गणेश, लक्ष्मी, कुसुम यांचा समावेश आहे. सुरुवातीच्या चार हत्तींपैकी आता एकमेव बसंती नावाची मादी हत्तीण जिवंत आहे. तिचे वय ८५ ते २० वर्षे असावे, असा माहुतांचा अंदाज आहे.
- निसर्ग सौंदर्य आणि हत्ती दर्शन असा येथे दुहेरी योग आहे. पण मुक्कामाची, जेवणासाठी हॉटेलची सोय नसल्याने येथे पर्यटकांची संख्या जेमतेम आहे.