शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

जागा गरिबांसाठी, शाळेत प्रवेश मात्र मिळतोय श्रीमंतांच्या मुलांना !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 18:55 IST

'आरटीई' मोफत प्रवेश प्रक्रिया : १०० विद्यार्थ्यांनी फिरवली प्रवेशाकडे पाठ

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात शैक्षणिक वर्ष २०२५-२६ करिता 'आरटीई' प्रवेश प्रक्रियेअंतर्गत गरीब व वंचित घटकातील विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातील खासगी शाळांमध्ये मोफत प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. मात्र, असे असतानाही जिल्ह्यात उपलब्ध ५०० जागांपैकी ३०७जागांवरच प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असून, उर्वरित १२५ जागा रिक्त राहिल्या आहेत. प्रवेश घेतलेल्यांमध्ये बहुतांश विद्यार्थी श्रीमंत व सधन घरातील असल्याचे दिसून येत आहे.

शैक्षणिक सत्र २०२५-२६साठीएकूण ९३४ अर्ज प्राप्त झाले होते. आतापर्यंत जिल्ह्यात आरटीई प्रवेशाच्या चार याद्या जाहीर करण्यात आल्या, यामध्ये ४३२ विद्यार्थ्यांची वर्ग पहिलीच्या प्रवेशासाठी निवड झाली. त्यापैकी ३०७विद्यार्थ्यांनीच प्रवेश निश्चित केला असल्याची माहिती पोर्टलवर दिसून आली. 

रिक्त जागा राहण्याची नेमकी कारणे काय ?शाळांचे अंतर : अनेक पालकांनी पसंतीची शाळा न मिळाल्याने, तसेच शाळेचे अंतर दूर होत असल्याने प्रवेश घेण्यास उत्सुकता दाखवली नाही.

खोटे कागदपत्रे जोडलीकाही प्रकरणांमध्ये प्रवेशासाठी खोटी कागदपत्रे जोडल्यानेही पडताळणीवेळी त्यांना अपात्र ठरविल्यानेही काही जागा रिक्त राहिल्या. दोन वर्षापूर्वी गडचिरोली शहरात तपासणीदरम्यान खोटे पत्ते दिल्याचे उघड झाल्यानंतर प्रवेश रद्द करण्यात आले होते.

चारवेळा संधी तरी प्रतिसाद नाहीया प्रक्रियेत नियमित आणि प्रतीक्षा यादीसह चार फेऱ्या राबविण्यात आल्या, निवड होऊनसुद्धा अनेक पालकांनी प्रवेश घेतला नाही. यामुळेच प्रवेशाच्या शंभरवर जागा रिक्त राहिल्या, तर दुसरीकडे इच्छुकांना लॉटरीच न लागल्याने त्यांना प्रवेश प्रक्रियेपासून दूर राहावे लागले आहे.

आरटीईअंतर्गत किती शाळांसाठी किती अर्ज आले?आरटीई प्रवेश प्रक्रिया जिल्ह्यात यंदा ६२ शाळांमध्ये राबविण्यात आली. यामध्ये ५०० जागांसाठी ९३४ अर्ज दाखल झाले होते. मागील वर्षीपेक्षा शाळा आणि जागांची यावर्षी वाढ करण्यात आली होती. मात्र, तरीही यावर्षी आरटीई प्रवेश प्रक्रियेला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले नाही.

१२५ जागा रिक्तपसंतीची शाळा न मिळाल्याने जवळपास १२५ जागा यावर्षी रिक्त राहिल्या आहेत.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाgadchiroli-acगडचिरोली