शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीतील डॉक्टरांचा आदर्श उपक्रम; घनदाट जंगलात पोहोचून दिली दुर्गम भागात आरोग्य सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2022 14:55 IST

याच वर्षी नाही तर गेल्या १० वर्षांपासून जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम बिनागुंडा या गावात अशा पद्धतीने ते आरोग्य सेवा देत आहेत.

गडचिरोली : ज्या दुर्गम भागातील नागरिकांना खाण्यासाठी अन्न मिळणेही कठीण आहे, तिथे आरोग्य सुविधा कशी पोहोचणार? पण गडचिरोलीतीलडॉक्टरांनी सामाजिक बांधीलकी जोपासत त्यांच्यापर्यंत विमामूल्य आरोग्य सेवा पोहोचविली. केवळ तपासणी आणि रोगनिदानच नाही तर शक्य तो उपचार आणि औषधोपचारही केले. शहरातील खासगी डॉक्टरांचा हा स्तुत्य उपक्रम आदर्श ठरला आहे.

शहरातील वेगवेगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांनी दुर्गम भागात सेवा देण्याचा विडा उचलला. महाराष्ट्रदिनी हा योग जुळवून आणला. याच वर्षी नाही तर गेल्या १० वर्षांपासून जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम बिनागुंडा या गावात अशा पद्धतीने ते आरोग्य सेवा देत आहेत. आरोग्य सेवेसोबत त्या लोकांना मायेने दोन घास भरवून आम्ही सदैव तुमच्यासोबत आहोत, हा संदेशही त्यांनी दिला.

यावेळी संपूर्ण आरोग्य तपासणी, औषधींचे वाटप, रक्तघटक तपासणी, वस्त्रदान, दैनंदिन जीवनावश्यक वस्तू वितरण, मच्छरदाणी वाटप, अन्नदान आदी उपक्रम राबविले. कोरोनाकाळामुळे गेली २ वर्षे या उपक्रमात खंड पडला होता; पण यावर्षी तो पुन्हा सुरू करण्यात आला. यावर्षीच्या उपक्रमाला सामाजिक कार्यकर्ते महेश काबरा यांनी जीवनावश्यक साहित्य उपलब्ध करून दिले. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल रुडे यांनी आवश्यक औषधसाठा उपलब्ध करून दिला. बिनागुंडा, फोदेवाडा, तुर्रेमर्का, कुवाकोडी, गुंडेनूर या गावातून जवळपास ३५० ते ४०० लोकांनी या आरोग्य मेळाव्याचा लाभ घेतला.

२०१२ मध्ये झाली सुरुवात

भामरागड तालुक्यातील बिनागुंडा हे तसे दुर्गम; पण तेवढेच निसर्गरम्य असे स्थळ; पण त्या ठिकाणी राहणारे लोक अत्यंत गरीब आणि मागास आहेत. दोन वेळच्या अन्नाची भ्रांत असताना वैद्यकीय सुविधा मिळणे त्यांच्यासाठी दुरापास्त. ही बाब गडचिरोली येथील डॉ. शिवनाथ कुंभारे व त्यांच्या सहकाऱ्यांनी लक्षात आणून दिली. समाजाप्रती आपली बांधीलकी आहे आणि हा खडतर प्रवास आपल्याला पूर्ण करायचा आहे, हा विडा उचलून डॉ.अनंत कुंभारे यांच्या नेतृत्वाखाली एक फळी या कामात गुंतली. महाराष्ट्र-छत्तीसगड राज्याच्या सीमावर्ती भागात वसलेल्या, अतिदुर्गम आणि मागास अशा बिनागुंडा गावात सन २०१२ पासून आरोग्य मेळावा घेण्यास सुरुवात झाली.

टॅग्स :Healthआरोग्यdoctorडॉक्टरgadchiroli-acगडचिरोलीSocialसामाजिक