इंद्रावती नदीवर हाेणार हाेता जलविद्युत प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2022 11:28 PM2022-11-06T23:28:54+5:302022-11-06T23:29:31+5:30

देचलीपेठा गावापासून दोन किलोमीटर पूर्व दिशेला एक डाेंगर आहे. या डाेंगरापासून दोन ते अडीच किलोमीटरवर इंद्रावती नदीपलीकडे छत्तीसगड राज्याला सुरुवात हाेते. या दोन डोंगरच्या मधोमध इंद्रावती नदी वाहते.  दोन डाेंगराच्या मधून इंद्रावतीचे पाणी धबधब्याच्या रुपाने पाणी खाली काेसळते. या ठिकाणी नदीची रुंदी फक्त जवळपास चाळीस फुट राहते. याच स्थानाला जितम म्हणून ओळखले जाते. 

The hydroelectric project will be built on the Indravati river | इंद्रावती नदीवर हाेणार हाेता जलविद्युत प्रकल्प

इंद्रावती नदीवर हाेणार हाेता जलविद्युत प्रकल्प

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क
अहेरी / सिरोंचा : अहेरी तालुक्यातील देचलीपेठा या गावाच्या किनारी वाहणाऱ्या इंद्रावती नदीवरील जितम या ठिकाणी जलविद्युत प्रकल्प हाेणार हाेता. मात्र हा प्रकल्प शासनाने निधी उपलब्ध करून न दिल्याने या प्रकल्पाचे काम पुढे जाऊ शकले नाही. 
देचलीपेठा गावापासून दोन किलोमीटर पूर्व दिशेला एक डाेंगर आहे. या डाेंगरापासून दोन ते अडीच किलोमीटरवर इंद्रावती नदीपलीकडे छत्तीसगड राज्याला सुरुवात हाेते. या दोन डोंगरच्या मधोमध इंद्रावती नदी वाहते.  
दोन डाेंगराच्या मधून इंद्रावतीचे पाणी धबधब्याच्या रुपाने पाणी खाली काेसळते. या ठिकाणी नदीची रुंदी फक्त जवळपास चाळीस फुट राहते. याच स्थानाला जितम म्हणून ओळखले जाते. 
या धबधब्याजवळ जलविद्युत प्रकल्प प्रायोजित होते. दाेन डाेंगरांच्या मधोमध माती भरून इंद्रावतीचे पाणी अडवून एक डॅम प्रकल्प प्रायोजित होते. बरेच लोक या धरणाला इंचमपल्ली धरण म्हणून उद्बोधत होते. 
प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात हे सर्व प्रायोजित होते. या स्थानावर सिंचाई विभागाच्या वतीने माती आणि दगड परिक्षणाचे काम दोन वर्षापर्यंत चालले होते. 
सिंचाई विभागाच्या चमूची निवासस्थान सध्याच्या पोलीस स्टेशन जवळ होते. काही गाव पाण्याखाली येणार म्हणून काही नागरिकांनी विराेध दर्शविला हाेता. तसेच शासनाकडूनही फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. 

डाेळ्यांचे पारणे फिटते 
येथील साैंदर्य दोन डाेंगराच्या मधून इंद्रावतीचे पाणी धबधब्याच्या रूपाने पाणी खाली काेसळते. या ठिकाणी नदीची रुंदी फक्त जवळपास चाळीस फुट राहते. याच स्थानाला जितम म्हणून ओळखले जाते. या पर्यटन स्थळाला चांगली प्रसिद्धी मिळाल्यास पर्यटनस्थळ म्हणून विकास हाेण्यास मदत हाेईल.

 

Web Title: The hydroelectric project will be built on the Indravati river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :riverनदी