शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
4
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
5
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
6
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
7
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
8
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
9
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
10
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
11
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
12
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
13
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
14
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
15
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
16
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
17
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
18
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
19
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
20
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
Daily Top 2Weekly Top 5

पीककर्जाचे उद्दिष्ट ३२० कोटीचे वाटप केले फक्त १६७ कोटी ! आर्थिक स्थिती नाजूक असलेल्या शेतकऱ्यांना काढावे लागते सावकाराकडून कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2024 14:00 IST

बँकांचा आखडता हात : जिल्ह्यातील शेतकरी बचत गटांच्या दारात

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : शेतीमध्ये ट्रॅक्टरसह इतर उपकरणांचा वापर वाढला असल्याने शेती लागवडीचा खर्च वाढला आहे. बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्यास तयार होत नाही. त्यामुळे बँकांना कर्ज वितरणाचे उद्दिष्ट जिल्हास्तरीय समितीमार्फत दिले जाते. तरीही बँका पीककर्जाचे वितरण करत नाही. 

बहुतांश शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अतिशय नाजूक आहे. मात्र शेती कसण्यासाठी खर्च येत असल्याने सावकाराकडून कर्ज काढावे लागत होते. सावकार ५० ते ६० टक्के व्याज दराने कर्ज देत होते. यात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक होत होती. शेतकरी लुबाडला जात होता. शेतकऱ्यांची सावकाराच्या पाशातून सुटका करण्यासाठी शासनाने पीककर्ज योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध करून दिले जाते. प्रत्येक शेतकऱ्याला पीककर्जाचा लाभ मिळावा, अशी शासनाची अपेक्षा आहे. त्यासाठीच जिल्ह्यात कार्यरत सर्वच प्रकारच्या बँकांना कर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठरवून दिले जाते. यात सार्वजनिक क्षेत्रातील बँका कसेतरी उद्दिष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात.

मात्र खासगी बँका तर केवळ एक ते दोन शेतकऱ्यांना कर्ज वितरित करीत असल्याचे दिसून येत आहे. उद्दिष्ट पूर्ण केले नाही तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने शेतकऱ्यांना कर्ज न देण्याची खासगी बँकांची मानसिकता वाढत आहे. यावर आवर घालण्याची गरज आहे.

जिल्हा बँकेमार्फत १३० कोटी रुपयांचे कर्ज वितरण 

  • दी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील सर्वांत मोठी बैंक आहे. या बँकेच्या जिल्ह्यात ५५ पेक्षा अधिक शाखा आहेत. बहुतांश शाखा प्रामुख्याने ग्रामीण भागात आहेत. त्यामुळे या बँकेची नाळ शेतकऱ्यांसोबत जोडल्या गेली आहे. 
  • स्थानिक कर्मचारी असल्याने ही बँक ग्रामीण भागातील नागरिकांना नेहमीच आपली वाटते. याच बँकेमार्फत सर्वाधिक कर्ज वितरित केले जाते. यावर्षी या बँकेला १३७ कोटी रुपयांच्या कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. बँकेने १०३ कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले आहे.

खागसी बँकांचा शहरातच पसारा जिल्ह्यातील नागरिकांचे वाढलेल्या उत्पन्नाचा फायदा करून घेण्यासाठी खासगी बँकांनी जिल्ह्यात शाखा उघडण्यास सुरुवात केली आहे. मात्र या शाखा जिल्हास्थळीच सुरू करीत असल्याचे दिसून येते. ग्रामीण व तालुकास्तरावर या बँकांच्या शाखा नाहीत. या बँकांचे व्यवस्थापक विविध कारणे सांगून शेतकऱ्यांना कर्ज देण्यास तयार होत नाही. ही स्थिती आहे. २०२४-२५ च्या खरीप हंगामात या बँकांना २७ कोटी रुपयांचे कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यापैकी या बँकांनी केवळ ५६ लाख रुपयांचे कर्ज वितरित केले आहे.

कारवाई कधी होणार? शेतकऱ्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी शासनासोबतच बँकांनी सहकार्य करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासन त्यांना कर्ज वितरणाचे उद्दिष्ट देते. मात्र बँका कर्ज वितरित करीत नाही. अशा बँकांवर कारवाई होणे आवश्यक आहे. मात्र कोणत्याच वर्षी कारवाई होत नसल्याने बँकांचे प्रशासन उद्दिष्टाला मानत नाही. बँकांवर दंडात्मक कारवाई शासनाने करणे आवश्यक आहे.

बॅकनिहाय कर्ज वितरण (कोटीत)                                  उद्दिष्ट                  वितरणसार्वजनिक बँका -          १०२                       ३७खासगी बँका -               २८                        ०.५६ग्रामीण बँका -                ४७                        २६सहकारी बँका -              १३६                      १०२

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीbankबँक