शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

नेचर सफारीचे द्वार झाले खुले; आता वाघ, बिबट, अस्वलांचेही होईल दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 14:02 IST

मार्गदर्शनासाठी गाईड : सकाळ- सायंकाळ दोन्ही वेळा घेता येईल निसर्गाचा अनुभव

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्ह्यात व्याघ्र व इतर वन्यजीवांच्या पर्यटनाला वाव देण्यासाठी गडचिरोली वनविभागात गुरवळा / हिरापूर संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या माध्यमातून नेचर सफारी दोन वर्षांपूर्वी सुरू करण्यात आली. या नेचर सफारीमुळे पर्यटकांना वाघ, बिबट, अस्वल यासारखे विविध प्रकारचे वन्यजीव जंगलात पाहण्याची प्रत्यक्ष संधी मिळाली. नेचर सफारीमध्ये भेट देण्याऱ्या बहुतांश पर्यटकांना वाघांचे दर्शन होत आहे. १० नोव्हेंबरपासून नेचर सफारी पर्यटकांसाठी सुरू करण्यात आली.

संयुक्त वनव्यवस्थापन समिती गुरवळा यांच्या वतीने १० डिसेंबर २०२१ रोजी नेचर सफारीची सुरुवात करण्यात आली. ३७३२.५३ हेक्टर जंगल क्षेत्रावर ही सफारी आहे. पर्यटकांना वाहनाद्वारे जंगलात निसर्गाचा अनुभव घेता यावा, यासाठी जुन्या पायवाटा दुरुस्त करून एकूण ६० कि.मी.चे कच्चे रस्ते तयार केले. येथे वनपर्यटनासह प्राणीदर्शन होते. 

दिवसातून दोन वेळा करता येते सफारी नेचर सफारीत सकाळी व सायंकाळी निसर्गाचा अनुभव घेता येतो. सकाळी ६ ते १० व दुपारी ३ ते ७ वाजेपर्यंत (उन्हाळ्यात) सफारीचा अनुभव पर्यटकांना घडवून आणतात. १ जुलै ते ३१ ऑक्टोबर हा पावसाळ्याचा कालावधी वगळता उन्हाळा व हिवाळ्यात सफारीतील पर्यटन सुरूच असते. पर्यटनासाठी गाइड किंवा समितीकडे नोंदणी करावी लागते. प्राणी बघण्यासह निसर्गाचा अनुभव घेण्यासाठी वनसमितीतर्फे गाइडची नियुक्ती केली आहे.

सफारीसाठी प्रवेश शुल्क किती? नेचर सफारीत खासगी वाहनासाठी १ हजार १०० रुपये प्रवेश शुल्क द्यावे लागते. तर वन व्यवस्थापन समितीने निश्चित केलेल्या जिप्सीकरिता ३ हजार १०० रुपये प्रवेश शुल्क द्यावे लागतात. दोन्ही वाहनांमध्ये गाइडसुद्धा उपलब्ध करून दिला जातो.

जंगलात वाघांसह विविध प्राण्यांचा वावर 

  • गुरवळा नेचर सफारीत सध्या जी-१, जी-१६ हे नरवाघ वावरत असून, जी-१० ही वाघीण व तिचे ४ बछडे आहेत. सध्या हे बछडे मोठे झालेले आहेत. त्यांचा वावर या भागात असून, पर्यटकांना वेळोवेळी त्यांचे दर्शन होते. 
  • नेचर सफारीत बिबट, अस्वल, तडस, रानकुत्री, कोल्हे, रानमांजर, हरीण, सांबर, नीलगाय यासह पक्ष्यांमध्ये मोर, रानकोंबड्या आदींसह विविध प्रकारचे वन्यजीव पाहायला मिळतात. त्यामुळे तीन वर्षांपासून पर्यटकांचा ओढा वाढलेला आहे.

"गुरवळा येथील नेचर सफारीत विविध प्रकारचे वन्यजीव आहेत. हे वन्यजीव प्रत्यक्ष पाहता येतील. यासाठी वाहने व गाइड उपलब्ध आहेत. नेचर सफारीच्या माध्यमातून पर्यटकांना जिल्ह्यातच निसर्गाचा अनुभव घडवून आणण्याचा वनविभागाचा प्रयत्न आहे." - विजय जनबंधू, क्षेत्रसहायक, गुरवळा

 

टॅग्स :wildlifeवन्यजीवGadchiroliगडचिरोली