शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

अनियंत्रित कार झाडावर धडकली, चालक युवक जागीच ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2023 17:22 IST

मालेवाडा-रामगड मार्गावर रानवाईजवळील घटना

कुरखेडा (गडचिरोली) : पुराडावरून रामगडमार्गे मालेवाडाकडे जाणारी चारचाकी कार रानवाईजवळ अनियंत्रित होऊन रस्त्याच्या बाजूला झाडावर धडकली. यात चालक युवक गीतेश्वर ऊर्फ गोलू तिलक महाजन (वय २२) हा जागीच ठार झाला. ही घटना मंगळवारी रात्री घडली. या मार्गावर रात्री वर्दळ राहत नसल्याने रात्रभर त्याचा मृतदेह तिथेच पडून होता. बुधवारी सकाळी हा अपघात निदर्शनास आला.

मृत गोलू महाजन हा पुराडा येथील रहिवासी होता. रात्री तो एकटाच कारने (एमएच २९, एआर ०५२६) पुराडावरून मालेवाडाकडे काही कामानिमित्त जात होता. दरम्यान, रानवाईजवळ त्याचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याचा बाजूला असलेल्या झाडावर धडकली. या अपघातात कारचा चक्काचूर होऊन गोलूचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच मालेवाडा पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता पाठविला. पुढील तपास मालेवाडा पोलिस मदत केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.

तीन दिवसांपूर्वीच झालं होतं साक्षगंध

ही घटना रात्रीची असल्याने हा अपघात कोणाच्या निदर्शनास आला नाही. सकाळी अपघाताची माहिती मिळताच रानवाई येथील गावकऱ्यांनी घटनास्थळाकडे धाव घेऊन मदतकार्य सुरू केले. मात्र चालकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला होता. विशेष म्हणजे मृत गीतेश्वर ऊर्फ गोलू याचा तीन दिवसांपूर्वीच साक्षगंध कार्यक्रम झाला होता. तो रात्री काही कामानिमित्त सासुरवाडी असलेल्या मानपूर (छत्तीसगड)कडे जाण्याकरिता स्वत:चा वाहनाने एकटाच निघाला होता, अशी माहिती आहे.

टॅग्स :AccidentअपघातGadchiroliगडचिरोली